दंड भरु पण बाहेर फिरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST2021-05-20T04:18:21+5:302021-05-20T04:18:21+5:30
काळी कमानला छावणीचे स्वरुप नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काळी कमान येथे नवा मोंढा पोलीस स्टेशन येथील ...

दंड भरु पण बाहेर फिरु
काळी कमानला छावणीचे स्वरुप
नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काळी कमान येथे नवा मोंढा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखेचे चार ते पाच कर्मचारी, आरसीपी प्लाटूनची तुकडी, वाहने उचलणारा ट्रक, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, चार ते पाच आरोग्य कर्मचारी एवढा फौजफाटा येथे कार्यरत आहे. येथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
उठाबश्या काढण्याची शिक्षा
काळी कमान परिसरात फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी आरसीपी प्लाटूनचे जवान कार्यरत आहेत. काही जण दूचाकीवरुन रिकामे फिरताना जवानांना आढळून आले. यावेळी त्यातील एकाला उठाबश्या काढण्याची शिक्षा देण्यात आली. तर काहींना थेट काठीचा प्रसाद देण्यात आला.
शिवाजी चौक, जाम नाका येथे तपासणी शहरातील जिंतूर रोडवरील जाम नाका, शिवाजी चौक येथे बुधवारी दुपारी चारपर्यंंत आरटीपीसीआर चाचणी मोहीम राबविण्यात आली. दिसेल त्याला अडवून दंड भरा किंवा तपासणी करा, असे आदेश पथक बजावत होते.