कोरोना चाचणींवर परभणीकरांचा रोज पावणेतीन लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST2021-03-29T04:11:36+5:302021-03-29T04:11:36+5:30

परभणी : शहरातील खाजगी प्रयोगशाळांमध्ये दररोज सरासरी १५० ते १७५ कोरोना चाचण्या होत असून, या चाचण्यांवर दररोज सुमारे ...

Parbhanikar spends Rs 53 lakh daily on corona tests | कोरोना चाचणींवर परभणीकरांचा रोज पावणेतीन लाखांचा खर्च

कोरोना चाचणींवर परभणीकरांचा रोज पावणेतीन लाखांचा खर्च

परभणी : शहरातील खाजगी प्रयोगशाळांमध्ये दररोज सरासरी १५० ते १७५ कोरोना चाचण्या होत असून, या चाचण्यांवर दररोज सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा खर्च होत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आरोग्य विभागाने जिल्ह्यातील तपासण्यांची संख्याही वाढविली आहे. मात्र, ज्या रुग्णांना झटपट अहवालाची आवश्यकता आहे, असे अनेक जण खाजगी प्रयोगशाळेमध्येही चाचणी करीत आहेत. शहरात एक खाजगी प्रयोगशाळा कार्यरत असून, या ठिकाणी सरासरी १५० ते १७५ तपासण्या होत आहेत. एका तपासणीला साधारणत: दीड हजार रुपये लागतात. एकूण तपासण्यांची संख्या लक्षात घेता दररोज २ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च खाजगी तपासण्यांवर केला जात आहे. शासकीय रुग्णालयातही कोरोना चाचण्यांची संख्या वाढलेली आहे; परंतु शासकीय रुग्णालयातून अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा विलंब लागतो. त्यामुळे बहुतांश नागरिक अत्यावश्यक गरज भासल्यास खाजगी प्रयाेगशाळेत जाऊन कोरोनाची तपासणी करीत आहेत. या नागरिकांना त्यांचा अहवालही काही वेळेतच दिला जात आहे.

१५०० रुपयांना कोरोनाची चाचणी

परभणी शहरात एकमेव खाजगी प्रयाेगशाळा कार्यरत आहे. मागच्या काही महिन्यांपासून ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. नागरिक आता या ठिकाणीही तपासण्या करीत आहेत.

या प्रयोगशाळेमध्ये एका तपासणीसाठी साधारणत: दीड हजार रुपयांचा खर्च येतो.

शासकीय रुग्णालयांबरोबरच खाजगी प्रयोगशाळांतही तपासण्या वाढल्या आहेत.

जिल्ह्यात दररोज केल्या जातात १५०० चाचण्या

जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य विभागाने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खाजगी रुग्णालये उपलब्ध करून दिली आहेत.

असे असताना होम आयसाेलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

शनिवारी जिल्ह्यामध्ये १ हजार ३८२ सक्रिय रुग्ण म्हणून नोंद झाले. त्यापैकी शासकीय आणि खाजगी रुग्णालयात मिळून ४२५ रुग्ण उपचार घेत आहेत,

तर तब्बल ९६९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतात. हे रुग्ण कितपत आयसोलेशनचा वापर करतात, हा संशोधनाचा विषय आहे.

Web Title: Parbhanikar spends Rs 53 lakh daily on corona tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.