शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी झेडपी निवडणूक: माजी मंत्री सुरेश वरपूडकरांचा मुलगा, सून, कन्या अन् पुतणेही रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:08 IST

केवळ वरपूडकरच नव्हे, तर आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबातही निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

परभणी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत परभणी जिल्ह्यात यंदा नातेसंबंधांची मोठी कसोटी लागणार आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, यात सून, मुलगा, मुलगी आणि दोन पुतण्यांचा समावेश असून ते भाजप, काँग्रेस आणि उद्धवसेना अशा तीन वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांतून नशीब आजमावत आहेत.

एकाच छताखाली तीन पक्षवरपूडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे सिंगणापूर या परंपरागत मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढत आहेत. त्यांच्या सूनबाई प्रेरणा वरपूडकर यांना दैठणा गटात भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे वरपूडकरांची कन्या सोनल देशमुख यांनी उद्धवसेनेची मशाल हाती घेतली असून, झरी गटात त्यांच्यासमोर त्यांचे सख्खे मामा दिलीप देशमुख (भाजप) यांचे मोठे आव्हान आहे.

पुतण्यांमध्ये 'काँटे की टक्कर' लोहगाव गटात तर वरपूडकर घराण्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. येथे दोन सख्खे चुलत भाऊ आमने-सामने आहेत. उत्कर्ष विजय वरपूडकर हे भाजपकडून, तर अजित अनिल वरपूडकर हे काँग्रेसकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत.

विटेकर कुटुंबाचीही प्रतिष्ठा पणालाकेवळ वरपूडकरच नव्हे, तर आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबातही निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर सोनपेठमधून, तर चुलती रुक्मिणीबाई भोसले पाथरीतून नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील या हाय-व्होल्टेज लढतींमुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मतदार 'नात्याला' प्राधान्य देतात की 'पक्षाला', हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani ZP Election: Varudkar Family Members Contest from Multiple Parties

Web Summary : Parbhani ZP election sees ex-minister Varudkar's family members from BJP, Congress, and Shiv Sena (UBT) contesting. Son, daughter, daughter-in-law, and nephews are in the fray, creating family rivalries and high-voltage contests.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५parabhaniपरभणीBJPभाजपा