शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

परभणी : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढला जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:38 IST

यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधना या दोन प्रमुख प्रकल्पांसह दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्पांतून पिकांच्या सिंचनाचा भार उचलला जातो़ याशिवाय उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटावर हे प्रकल्पच मात करतात़ मात्र मागील तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नव्हता़ परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत असे़ यावर्षी देखील सुरुवातीच्या काळात अत्यल्प पाऊस झाला़ त्यात प्रकल्पांमध्ये थोडाही पाणीसाठा जमा झाला नव्हता़ मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्पांची स्थिती पालटून टाकली आहे़ सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरडेठाक असलेले प्रकल्प आॅक्टोबर महिन्यातील पावसाने मात्र १०० टक्के भरले आहेत़ विशेष म्हणजे, येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे़ त्याचबरोबर लघु प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब भरले आहेत़ परिणामी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात याच प्रकल्पांमध्ये थोडा बहुत पाणीसाठा शिल्लक होता़ मागील वर्षीच्या आॅक्टोबरमध्ये येलदरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ तर निम्न दुधना प्रकल्पामध्ये १५़२६ टक्के, झरी तलावात ८६ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात ५५ टक्के, डिग्रस बंधाऱ्यात ५० टक्के आणि मुदगल बंधाºयामध्ये ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ विशेष म्हणजे मुळी, ढालेगाव आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प चक्क कोरडेठाक होते़ यावर्षी ही परिस्थिती बदलली असून, येलदरीसह मासोळी, मुदगल आणि ढालेगाव बंधारा १०० टक्के भरला आहे़ तर निम्न दुधना प्रकल्पात सद्यस्थितीला १३़ ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ झरीच्या तलावात ९३ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात ८४ टक्के, डिग्रस बंधाºयात ८१़३४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट निभावले आहे़उदासीनतेमुळे मुळी बंधारा कोरडा४यावर्षी जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाचे पाणी अनेक वेळा गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले़ या पाण्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीवर बांधलेले सर्व बंधारे पाण्याने तुडुंब भरले़ मात्र याच नदीवर गंगाखेड तालुक्यात बांधलेला मुळी बंधारा अजूनही कोरडा आहे़४सद्यस्थितीला या बंधाºयात केवळ ९़४४ टक्के पाणीसाठा आहे़ मुळी बंधाºयाचे दरवाजे २०१६ मध्ये आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेले होते़ तेव्हापासून जलसंपदा विभागाने या बंधाºयाला दरवाजे बसविले नाहीत़ मुळी बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली़ प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतु, प्रशासनाने मात्र दखल घेतली नाही़४परिणामी येथील ग्रामस्थांना सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या बंधाºयात पाणीसाठा झाला असता तर गंगाखेड शहराच्या पाणी प्रश्नांबरोबरच हजारो हेक्टरवरील शेत जमीन सिंचनाखाली आली असती़ मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकºयांना फटका सहन करावा लागत आहे़ ं‘येलदरी’ने तीन जिल्ह्यांना तारले४सहा वर्षांपासून येलदरी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होत नसल्याने परभणीसह नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होत होता़ मागील वर्षी परभणी शहराला येलदरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला़४या प्रकल्पात पाणी नसल्याने चिंता वाढल्या होत्या़ मात्र आॅक्टोबर महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फायदा या प्रकल्पाला झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला असून, या प्रकल्पावर अवलंबनू असलेला सिद्धेश्वर प्रकल्पही ९४़३३ टक्के भरला आहे़ परिणामी, तिन्ही जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण