परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:24 AM2019-08-06T00:24:59+5:302019-08-06T00:25:24+5:30

पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९०० हेक्टर जमीन व नदीकाठावरील गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता.

Parbhani: Wastage of water in the dam | परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय

परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९०० हेक्टर जमीन व नदीकाठावरील गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता.
तालुक्यातील कंठेश्वर, महागाव, निळा शिवारातील पूर्णा नदीवर २००९ मध्ये कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. १० वर्षे उलटूनही या बंधाºयाचे काम केवळ ८० टक्केच पूर्ण झाले आहे. शासनाकडून कधी अतिरिक्त निधी तर अधिकाऱ्यांची काम कुचराई तसेच कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे १० वर्षे उलटले तरी या बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही. संभाव्य बंधाºयाची उंची साडेचार मीटर एवढी असून हा बंधारा पूर्ण झाल्यास परिसरातील ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये निळा येथील ४०० हेक्टर, कळगाव येथील १०० हेक्टर, कंठेश्वर येथील १००, आजदापूर १०० हेक्टर तर कान्हडखेड या परिसरातील शेतकºयांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्याच शेती सिंचनाबरोबरच अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. कोल्हापुरी बंधाºयासाठी शासनाकडून वेळोवेळी अतिरिक्त निधी देण्यात आला. कामाचे वाढते स्वरुप व दिलेला निधी अपुरा पडत असल्याने वर्षानुवर्षे या बंधाºयाचे काम रखडत गेले.
मागील अनेक वर्षापासून दर पावसाळ्यात पूर्णा शहराजवळील नदीवरील बंधाºयातील पाणी उलटून पुढे जाते. हे पाणी कंठेश्वर, निळा, महागाव या शिवारातील बंधाºयात जाते; परंतु, या बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने या बंधाºयात पाणी साठत नाही. परिणामी हे पाणी कंठेश्वर येथे गोदावरी नदीपात्रात जाते. याही वर्षी शनिवार, रविवारी झालेल्या पावसाच्या पाण्याची कुठेही साठवण न झाली नसल्याने पूर्णा नदीपात्रात आले होते.
यावर्षीही या पाण्याचा मोठा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांचा अनेक वर्षापासून शासनाशी संघर्ष सुरु आहे.
कामाची मुदत चार वर्षापूर्वीच संपली
४पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर, महागाव व निळा शिवारातील बंधाºयाच्या प्रत्यक्ष कामास १० वर्षापूर्वी सुरुवात झाली. या बंधाºयाची अंतिम मुदत २०१५ मध्ये संपुष्टात आली. या बाबत लघु पाटबंधारे विभागाने वेळोवेळी वाढीव मुदतवाढ मागितली; परंतु, ती मिळाली नाही. या रखडलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी आपली तक्रार लोकशाही दिनामध्ये मांडली.
४या कामाचा प्रश्न तहसील, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह मंत्रालयापर्यंत पोहचविण्यात आला; परंतु, संबंधित विभागाने कंत्राटदारांकडून खुलासा मागविला. परंतु, या खुलासा काय आला व त्याचे पुढे काय झाले, याबाबत कळू शकले नाही. अर्धवट कामामुळे मात्र या बंधाºयातील पाणी वाया जात आहे. याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

Web Title: Parbhani: Wastage of water in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.