Parbhani: Violent beating by throwing a gardener | परभणी :मळी टाकण्यावरून जोरदार मारहाण
परभणी :मळी टाकण्यावरून जोरदार मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शेतात मळी टाकण्याच्या कारणावरून टँकर चालक आणि मालकामध्ये मारहाण झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी नाका परिसरात घडली़ या प्रकरणी ८ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़
मळीने भरलेला टँकर परळी रस्त्यावरील बन पिंपळा शिवारातील एका शेतात रिकामा करून येत असताना पांढऱ्या रंगाची कार्पिओ गाडी घेवून आलेल्या ५ ते ६ जणांनी आमच्या मालकाच्या शेतात मळी का टाकली? या कारणावरून टँकर चालक व त्याच्यासोबत असलेल्या खमरोद्दीन मंजूर अली खान यांना शिवीगाळ केली़ त्यानंतर हे दोघेही त्या ठिकाणावरून निघून गेले़
त्यानंतर परत परळी नाका परिसरात असलेल्या एका आॅटोमोबाईल्सच्या मागील बाजुने बबन पाळवदे यांच्या गाडीत आलेल्या ५ ते ६ जण व दुचाकीने आलेल्या दोघांनी काठी, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले़ या मारहाणीत दोघेही जखमी झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना खमरोद्दीन मंजूर अली खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी आठ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, राजकुमार बंडेवाड तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: Violent beating by throwing a gardener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.