परभणी : अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:36 IST2018-09-14T00:35:48+5:302018-09-14T00:36:28+5:30
अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

परभणी : अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ववत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत सुरू करून सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्तीची महामंंडळाच्या अध्यक्षपदी निवड करावी, महामंडळात पूर्वी चालत असलेल्या सर्व योजना सुरू कराव्यात, महामंडळाला ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, जामीनदाराची अट रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे नुकतेच देण्यात आले आहे. या निवेदनावर नगरसेवक चंद्रकांत खंदारे, प्रा. जी.एच. वाघमारे, रोहिदास लांडगे, केशव शेळके, अमोल अवचार, सुरेश उफाडे, बालाजी डांगे, अदिनाथ कांबळे, माधव उफाडे, नेताजी आव्हाड, अविनाश उफाडे, विजय हातागळे, बालाजी उफाडे, शुभम अवचार आदी समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.