परभणी : अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:54 IST2019-04-15T23:54:34+5:302019-04-15T23:54:53+5:30
तालुक्यातील पेडगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली़

परभणी : अपघातात दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील पेडगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली़
या संदर्भात मिळालेली माहिती अशी, मानवत तालुक्यातील मानोली येथील प्रकाश ज्ञानोबा सुरवसे हे परभणी तालुक्यातील लोहगाव येथील जय नृसिंह साखर कारखान्यावर नोकरीस आहेत़ सोमवारी सायंकाळच्या सुमारास प्रकाश सुरवसे व अन्य एक दुचाकीवरून मानोलीकडे जात होते़ यावेळी पेडगाव पाटी जवळील रॉयल हॉटेल परिसरात लघुशंकेसाठी दुचाकी उभी करण्यात आली़ यावेळी प्रकाश सुरवसे हे दुचाकीजवळच थांबले होते़ एवढ्यात समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीसह सुरवसे यांना धडक दिली़ यात प्रकाश सुरवसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली़ दरम्यान घटनेनंतर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती़ उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता़ दरम्यान, धडक देणाऱ्या वाहनाची माहिती मिळू शकली नाही़