परभणी : खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:48 IST2018-05-06T00:48:53+5:302018-05-06T00:48:53+5:30

व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़

Parbhani: Two more arrested in the murder case | परभणी : खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

परभणी : खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़
जवाहर कॉलनी भागातील शेख अल्ताफ याचा व्याजाचे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना ४ मे रोजी घडली होती़ पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी शेख अल्ताफ याला त्याच्या घरातून नेले होते़ त्यानंतर त्याचा खून झाल्याचे कुटूंबियांच्या लक्षात आले़ या प्रकरणी शेख एजाज शेख कालू यांच्या फिर्यादीवरून सलीम फारुखी, सलाउद्दीन फारुखी, तब्बन फारुखी, शेख साबेर यांच्याविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा शेख साबेर व तब्बन फारुखी या दोघांना अटक केली होती़ शनिवारी दवाखाना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने मिर्झा शकील बेग व म़ पाशा राज या दोघांना अटक केली आहे़ पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, जमादार अशोक सोडगीर, सय्यद उमर, संजय पुरी यांनी ही कारवाई केली़ या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़ शुक्रवारी अटक केलेल्या तब्बन फारुखी व शेख साबेर या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता १० मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

Web Title: Parbhani: Two more arrested in the murder case