परभणी: हत्यार वापरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:01 IST2019-04-02T00:00:48+5:302019-04-02T00:01:18+5:30
चारचाकी गाडीतून हत्यार घेऊन फिरत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

परभणी: हत्यार वापरणाऱ्या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चारचाकी गाडीतून हत्यार घेऊन फिरत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
शहरातील वसमतरोडवरील ब्रह्मा- विष्णू अपार्टमेंट समोरील रस्त्यावरुन एका वाहनातून धारधार शस्त्र दाखवून धमकावल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका युवकाने दिली.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक एस.के.वाघमारे, शिवाजी बोडले, जमादार चंद्रकांत टाकरस, महिला पोलीस कर्मचारी पौळ यांनी एम.एच.२२/एस २५ ही गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत एक धारधार शस्त्र आणि गावठी एअरगन मिळून आली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी रोहित निर्वळ व एका महिलेच्या विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.