शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परभणी : ट्रॉमा केअर सेंटरच्या उद्देशालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:34 IST

रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले परभणीतील ट्रॉमा केअर सेंटर साधनसामुग्रीअभावी वापराविनाच पडून असल्याने या ट्रॉमा केअर सेंटर स्थापन्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचा गंभीर शेरा महालेखाकारांंच्या लेखापरिक्षणात मारण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले परभणीतील ट्रॉमा केअर सेंटर साधनसामुग्रीअभावी वापराविनाच पडून असल्याने या ट्रॉमा केअर सेंटर स्थापन्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचा गंभीर शेरा महालेखाकारांंच्या लेखापरिक्षणात मारण्यात आला आहे.राज्यात २०११ ते २०१५ या कालावधीत ३ लाख २३ हजार २०५ रस्ते दुर्घटना नोंदविण्यात आल्या आहेत. ज्यात ६५ हजार ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते दुर्घटनेतील मृत्यूला रोखून त्यांची संख्या १० टक्क्यावर आणण्याकरीता केंद्र सरकारने ११ व्या पंचवार्षिक (२००७-१२) योजनेपासून राज्यात राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय रुग्णालयात ट्रॉमा केअर सुविधा विकसित करण्याकरीता क्षमतेची वर्धन ही योजना राबविण्यात आली. या ट्रॉमा केअर सेंटरमधील मनुष्यबळाचा विकास आणि साधन सामुग्रीकरीता विशेष निधी केंद्र शासनामार्फत वितरित केला जातो. या ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाकाजाचे लेखापरिक्षण करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील ७३ पैकी फक्त ४ ट्रॉमा केअर सेंटरचे कामकाज केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे सुरु असल्याचे दिसून आले. उर्वरित ६९ ट्रॉमा केअर सेंटरचे कामकाज समाधानकारक नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे महाराष्ट्र सुदूर संवेदना प्रवर्तन केंद्र (एमआरएसएसी) नागपूर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, महिला आणि बालरुग्णालय आदींच्या स्थापनेसाठी डेटाबेस तयार करण्यास सांगण्यात आले. जे राज्याचा बृहत आराखडा आणि जिल्हानिहाय परिप्रेक्ष्य योजना तयार करण्याकरीता उपयोगी पडेल. त्या अनुषंगाने प्रस्तुत केलेल्या जागेसंबंधीच्या डेटाबेसच्या आधारावर जानेवारी २०१३ मध्ये बृहत आराखडा तयार केला गेला. ज्यात २०१३ ते २०१८ दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र , उपजिल्हा रुग्णालय, महिला आणि बालरुग्णालय या सारख्या इतर आरोग्य विषयक सुविधांसह ३९ नवीन ट्रॉमा केअर सेंटरची स्थापन करणे नमूद होते. विशेष म्हणजे जानेवारी २०१७ पर्यंत असे एकही नवीन ट्रॉमा केअर सेंटर स्थापन केले नाही, असेही लेखापरिक्षणात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यात ज्या ६९ ट्रॉमा केअर सेंटरचे कामकाज समाधानकारक नव्हते, त्यामध्ये परभणी शहरामधील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरचाही समावेश आहे. परभणीत मे २००५ मध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यात आले; परंतु, प्रारंभी येथे साधन सामुग्रीच्या उपलब्धतेअभावी ते लघुशस्त्रक्रियागार म्हणून वापरण्यात येत होते. तसेच ट्रॉमा अपघातग्रस्तांना उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत होते. या संदर्भात महालेखाकारांनी नोंदविलेले सदरहून अभिरक्षण संबंधित ट्रॉमा केअर सेंटरच्या शल्यचिकित्सकांनी मान्य केले आहे. परभणीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना हे अधिकारी जिल्हा रुग्णालयात काम करतात. कर्मचाºयांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे ट्रॉमा केअर नावाची फक्त इमारत उभी आहे. उर्वरित येथील बहुतांश यंत्रणेचा वापर जिल्हा रुग्णालयासाठीच होत असल्याचेच ताशेरे ओढण्यात आले आहेत. येथील ट्रॉमा केअर सेंटर तब्बल दीड वर्ष बंद होते. येथील इमारतीचा वापर कधी शिशूगृहासाठी, कधी डोळ्याच्या दवाखान्यासाठी तर कधी डायलेसीस रुग्णांसाठी करण्यात आला. ट्रॉमा केअर सेंटरसाठी थेट केंद्र शासन निधी देत असताना मिळणाºया या निधीतून पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी मात्र ट्रॉमा केअर सेंटर ऐवजी दुसरीकडेच काम करीत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या ट्रॉमा केअर सेंटरच्या कामात सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे महालेखाकारांनी अहवालात नमूद केले आहे.ट्रॉमा केअरवरील खर्च निष्फळकेंद्र शासनाने ज्या उद्देशाने ट्रॉमा केअर सेंटर उभारणी हातात घेतली होती, त्यानुसार ट्रॉमा केअरचे कामकाज होणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे यासाठी केंद्र शासन निधी देत असताना समाधानकारक काम झाले नसल्याने ट्रॉमा केअर सेंटरवर निष्फळ निधी खर्च झाला, असे राज्य विधी मंडळाच्या लोकलेखा समितीच्या ४१ व्या अहवालात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ट्रॉमा केअर सेंटरची इमारत, मनुष्यबळ, यंत्र सामुग्री यांचे नियोजन समांतररित्या न केल्यामुळे अडचणी उद्भवल्या, असे नमूद करीत या कार्यपद्धतीवर नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. यापुढील काळात ट्रॉमा केअर सेंटरबाबत गंभीररित्याने विचार करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत पूर्णत: कार्यान्वित न झालेले अथवा अंशत: कार्यान्वित असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर्संना सुसज्ज व परिपूर्ण करण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करण्यात यावी व ही ट्रॉमा केअर सेंटर्स स्वतंत्ररित्या कार्यान्वित करण्यात यावीत. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती लोकलेखा समितीस तीन महिन्यात देण्यात यावी, असेही जुलै २०१८ मध्ये लोकलेखा समितीने केलेल्या शिफारसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष कारणीभूतट्रॉमा केअर सेंटर केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी या विभागप्रमुखाची आहे; परंतु, परभणी येथील ट्रॉमा केअर सेंटरचे विभागप्रमुख याकडे फारसे लक्ष देत नसल्याचेच महालेखाकारांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. स्थानिक अधिकाºयांनी व्यवस्थित लक्ष दिले असते तर ट्रॉमा केअर सेंटर स्थापन्यामागचा उद्देश सफल झाला असता; परंतु, तसे न होता पगार ट्रॉमा केअर सेंटरच्या निधीतून घ्यायचा आणि कामकाज मात्र जिल्हा रुग्णालयात करायचे असा काहीसा प्रकार परभणीत झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलAccidentअपघात