परभणी : पोलीस दलातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:54 AM2019-09-12T00:54:05+5:302019-09-12T00:54:31+5:30

आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा २२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी काढले आहेत़

Parbhani: Three officers transferred to police force | परभणी : पोलीस दलातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

परभणी : पोलीस दलातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा २२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी काढले आहेत़
११ सप्टेंबर रोजी हे आदेश काढण्यात आले असून, त्यात गंगाखेड येथील सहायक पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले यांची पोलीस अधीक्षकांचे वाचक या पदावर, जिंतूर येथील सुनील गिरी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून, चारठाणा पोलीस ठाण्यातील अजयकुमार पांडे यांची गंगाखेड येथे, नवा मोंढा पोलीस ठाण्यातील प्रवीण दिनकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर यांचे वाचक म्हणून, याच पोलीस ठाण्यातील सविता कलटवार यांची कोर्ट पैरवीसाठी तर मानवत येथील पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे यांची जिंतूर येथे, नवा मोंढा पोलीस ठाण्यातील शिवशंकर मनाळे यांची शहर वाहतूक शाखेत, कोतवाली पोलीस ठाण्यातील नंदलाल चौधरी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी ग्रामीण यांचे वाचक म्हणून, पिंपळदरी पोलीस ठाण्यातील संतोष मुपडे यांची परभणी येथे नानलपेठ पोलीस ठाण्यात, जिंतूर पोलीस ठाण्यातील दत्ता कालगुले यांची पिंपळदरी येथे, बामणी येथील सुनील पल्लेवाड यांची नवा मोंढा पोलीस ठाण्यात तर जिंतूर येथील बाबासाहेब लोखंडे यांची परभणी येथे आर्थिक गुन्हा शाखेत बदली करण्यात आली आहे़
४अन्य एका आदेशावरून १० अधिकाºयांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये सेलू येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांची सेलू येथे, शहर वाहतूक शाखेतील गजेंद्र सरोदे यांची सेलू येथे, कोतवाली पोलीस ठाण्यातील गुलाब बाचेवाड यांची सायबर सेलमध्ये, नानलपेठ पोलीस ठाण्यातील अभय दंडगव्हाण यांची जिंतूर येथे, कोर्ट पैरवीचे शिवदास लहाने यांची ताडकळस येथे, नियंत्रण कक्षातील कल्पना राठोड यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात, नानलपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हनुमंत नागरगोजे यांची बामणी येथे, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर यांचे वाचक अनिल आदोडे यांची दैठणा येथे, नानलपेठ पोलीस ठाण्यातील सचिन द्रोणाचार्य यांची गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून तर महिला सहाय्यक कक्षातील उपनिरीक्षक सुप्रिया केंद्रे यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़

Web Title: Parbhani: Three officers transferred to police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.