शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

परभणी : तीन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:16 AM

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़परभणी शहराला मुबलक पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरू आहे़ येलदरी येथून या योजनेसाठी पाणी घेतले असून, जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे़ मागील अनेक वर्षापासून रखडलेली ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास पूर्ण झाले आहे़ शहरातही बहुतांश भागात जलवाहिनी अंथरण्यात आली आहे़ सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा होईल, असा विश्वास मनपाला आहे़ दरम्यान, या योजनेसाठी येलदरी येथे उद्भव विहीर बांधण्यात आली असून, धर्मापुरी जवळील जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाणार आहे़ या दोन्ही कामांसाठी एक्सप्रेस फिडरच्या अंतर्गत महापालिकेला वीज जोडणी घ्यावी लागते़ येलदरी आणि धर्मापुरी येथे चार विद्युत पंप असून, या पंपाच्या सहाय्याने २४ तास पाण्याचा उपसा केला जातो़ यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता भासते़ ही गरज भागविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेंतर्गत वीज निर्मितीही करण्याचे धोरण शासनाने आखले आहे़ या धोरणानुसार प्रत्येक पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत़ परभणी महापालिकेसाठी अमृत योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे़ यासाठी शासनाने एका संस्थेची नियुक्ती केली असून, ही संस्था हा प्रकल्प उभारण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सध्या करीत आहे़ हा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असून, शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे़ या प्रकल्पाची उभारणी झाल्यास महापालिकेचे पाणीपुरवठ्यासाठी लागणारे वीज बिल वाचणार आहे़जागा निश्चितीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवातच्परभणी येथे पाणीपुरवठा योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी सध्या जागेची पाहणी केली जात आहे़ अमृत योजनेंतर्गत साधारणत: २० मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे़च्यासाठी सुमारे २० ते २५ एकर जागेची आवश्यकता आहे़ परभणी शहराची पाणीपुरवठा योजना लक्षात घेता शहरात ३ मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे़च्जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परभणी तालुक्यातील धर्मापुरी परिसरात जागेची पाहणी केली जात आहे़ लवकरच जागा निश्चिती झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे़मेडा संस्थेकडे प्रकल्पाचे काम४सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी सध्या डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे़ हे काम शासनाच्या मेडा या संस्थेला देण्यात आले आहे़ धर्मापुरी आणि येलदरी या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़४सौर उर्जेच्या सहाय्याने साधारणत: ३ मेगावॅट विजेची निर्मिती करून ही वीज महावितरण कंपनीला दिली जाणार आहे४कंपनीकडून आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा योजनेसाठी वीज घेतली जाणार आहे़ या प्रकल्पाच्या उभारणीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़३५ लाख रुपयांची होणार बचतच्शहराला सध्या राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे़ या पाणीपुरवठा योजनेंतर्गत राहटी येथे दोन आणि वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रात २ असे ४ विद्युत पंप चोवीस तास कार्यरत असतात़च्या पंपांसाठी महापालिकेला महिन्याकाठी साधारणत: ३५ लाख रुपयांचा खर्च येतो़ सध्या महापालिकेच्या स्वनिधीतून हा खर्च भागविला जात आहे़च्नवीन पाणीपुरवठा योजनेसाठीही एवढाच खर्च अपेक्षित आहे़ सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी झाल्यास ३५ लाख रुपयांचा वीज बिलापोटीच्या खर्चाची बचत होणार आहे़सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम शासनाच्या मेडा कंपनीकडे असून, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा परभणी शहरास भेट दिली आहे़ येलदरी, धर्मापुरी, राहटी इ. भागांतील जागा या अधिकाºयांना दाखविण्यात आल्या़ सर्वसाधारणपणे पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातच जागा निश्चित केली जाणार आहे़ साधारणत: १५ एकर जागेची आवश्यकता आहे़ येलदरी येथे पाटबंधारे विभागाची जागा असून, या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारला जाईल़ या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलावर होणाºया खर्चाची बचत होणार आहे़-रमेश पवार, आयुक्त, महानगरपालिका, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीwater transportजलवाहतूक