परभणी : ‘त्या’ विद्यार्थिनींचा केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:01 IST2018-09-29T23:59:41+5:302018-09-30T00:01:19+5:30
पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

परभणी : ‘त्या’ विद्यार्थिनींचा केला सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि.प. बांधकाम सभापती अशोक काकडे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, वाहतूक नियंत्रक वसंत बोराडे, चंद्रकांत कदम आदींची उपस्थिती होती. शाळेतून बसस्थानकाकडे येत असलेल्या विद्यार्थिनींची छेड काढणाºया दोन रोडरोमियोंना आठ विद्यार्थिनींनी एकत्र येऊन धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. हा प्रकार २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता बसस्थानकात घडला होता. विद्यार्थिनींनी दाखविलेल्या हिंमतीबद्दल त्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बजरंग आरकुले यांनी सूत्रसंचालन केले तर छगन शेरे यांनी आभार मानले.