परभणी : जिंतूरमध्ये दोन दुकानांत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:32 IST2018-01-18T00:31:46+5:302018-01-18T00:32:16+5:30
शहरातील जालना रोडवरील एक पानपट्टी आणि एक हॉटेल फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परभणी येथून श्वानपथक पाचारण केले होते.

परभणी : जिंतूरमध्ये दोन दुकानांत चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : शहरातील जालना रोडवरील एक पानपट्टी आणि एक हॉटेल फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परभणी येथून श्वानपथक पाचारण केले होते.
जालना रोेडवरील रहीम खान कलंदर खान व मोगल दरबार या हॉटेलचे मालक शेख जानीमियाँ यांनी १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता आपली दुकाने बंद केली. त्याच रात्री चोरट्यांनी ही दुकाने फोडून रोख ८२० रुपये व इतर साहित्य असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बुधवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, फौजदार सुरेश नरवाडे, जमादार काकडे, रवि सुरदुसे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान जालना रोडवरील एका दुचाकीच्या शोरुमपर्यंतच माग काढू शकले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
जिंतूर शहरात महामार्गावरील दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.