परभणी : भिशीतून २० लाखांना गंडा; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:10 IST2018-06-20T00:10:38+5:302018-06-20T00:10:38+5:30
भिशीतून १०० जणांची फसवणूक करीत २० लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी दोघा भावांविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

परभणी : भिशीतून २० लाखांना गंडा; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : भिशीतून १०० जणांची फसवणूक करीत २० लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी दोघा भावांविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
सय्यद आवेस नसिरोद्दीन यांनी ही फिर्याद दिली असून, त्यानुसार जिंतूर शहरातील संतोष अशोक साळवे व विठ्ठल अशोक साळवे हे शहरातील नागरिकांकडून प्रतिमहिना पैसे घेऊन भिशी चालवित होते़ परंतु, ठरल्या प्रमाणे पैसे परत केले नाहीत़ आरोपींनी खोटे आश्वासन देऊन सुमारे १०० जणांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी १८ जून रोजी अशोक साळवे यास अटक केली़ न्यायालयाने त्यास २५ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश नरवडे करीत आहेत़