लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): पूर्णा नदीपात्रातूनवाळूची चोरी करून वाहतूक करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरविरूद्ध तहसीलदार व त्यांच्या पथकाने ७ जुलै रोजी सायंकाळी कारवाई केली आहे़पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील पूर्णा नदीपात्रातूनवाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक केली जात होती़अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी तहसीलदार श्याम मदनूरकर व त्यांचे पथक या परिसरात गस्त घालत असताना एमएच २२ एच-८८६ व एमएच २२ एच-६८७० ही दोन वाहने प्रत्येकी १ ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ पूर्णा ते कानडखेड या कच्च्या रस्त्यावर दोन्ही वाहनांना थांबविण्यात आले़ वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ही वाहने पथकाने जप्त केली असून, पूर्णा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत़ दोन्ही वाहनांविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलच्या सूत्रांनी दिली़
परभणी : दोन ट्रॅक्टरविरुद्ध तहसीलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:03 IST