शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:53 IST

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैचारिक मंथन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने १६ डिसेंबर रोजी परभणीत एक दिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैचारिक मंथन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने १६ डिसेंबर रोजी परभणीत एक दिवसीय राज्यस्तरीय दुष्काळशेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांनी दिली.या पत्रकार परिषदेस अ‍ॅड़ विष्णू नवले, अरुण चव्हाळ, कवी केशव खटींग, राजेंद्र गहाळ, प्रा़ सुनिल तुरूकमाने, सुभाष ढगे, यशवंत मकरंद, मंचकराव बचाटे, राज शेलार, दत्ता सुरवसे, प्रा़ सुरेश कदम, राहुल वहीवाळ, मिलिंद घुसळे, प्रा़ विनय गुजर, फेरोजभाई, हेमंत साळवे, गणेश बोरीकर, निलेश भुसारे, विजय कदम, ओंकार पौळ, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जाधव, संदीप देशमुख, योगेश ढगे यांची उपस्थिती होती़संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख- राहेरीकर यांची निवड करण्यात आली आहे़ साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्तंभलेखक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे़ साहित्य संमेलनास कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव, डॉ़आसाराम लोमटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या साहित्य संमेलनात शेती व शेतकºयांसाठी उल्लेखनीय योगनदान देणाºयांचा गौरव करण्यात येणार आहे़ १६ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनात शेती-शेतकरी दुष्काळ व साहित्य आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे़ या परिसंवादात कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली व्यासपीठावरून ‘बारोमासकार’ सदानंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, डॉ़ शिवाजी दळणर, पत्रकार डॉ़ आसाराम लोमटे हे संवाद साधणार आहेत़ राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया तर कथाकथनात शिवदास पोटे, बबन आव्हाड, राजा कदम, संगीता देशमुख यांचा सहभाग राहणार आहे़कविसंमेलनात या कवींचा सहभाग४रेणु पाचपोर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया कविमसंलनात प्राचार्य गोविंद गायकी, अमृत तेलंग, अर्चना डावरे, संतोष नारायणकर, श्रीनिवास मस्के अरविंद सगर, शिवाजी मरगीळ, प्रा़ कल्याण कदम, प्रा़ राम कठारे, चंद्रकांत कावरखे, प्रमोद देशमुख, यशवंत मकरंद, शरद ठाकर, सुरेश हिवाळे, प्रेमानंद शिंदे, संगीता देशमुख, आण्णा जगताप, राजेश रवले हे सहभागी होणार आहेत़ कविसंमेलनाचे सूत्रसचांलन कवी केशव खटींग हे करणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी