शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
2
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
3
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
4
"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?
5
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
6
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
8
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
9
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
10
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
11
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
12
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
13
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा
14
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
15
Tarot Card: उक्तीला कृतीची जोड हवी, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा!
16
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
17
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
18
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
19
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
20
ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

परभणी: उन्हाबरोबर टंचाईची दाहकता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:23 AM

उन्हाळा सुरु होताच बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याबरोबर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने ६६ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी उर्वरित भागात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): उन्हाळा सुरु होताच बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याबरोबर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने ६६ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी उर्वरित भागात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.या पावसाळ्यात गंगाखेड तालुका व परिसरात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील बहुतांश गावांना आॅक्टोबर महिन्यातच पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली. गावात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयाने विहीर, बोअर अधिग्रहण व पाण्याचे टँकर सुरू करण्याचे ठराव पारित करून घेतले. त्यानंतर गंगाखेड पंचायत समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाकडे विहीर, बोअर व टँकर अधिग्रणाचे प्रस्ताव सादर करण्यात आले.२९ नोव्हेंबर २०१८ ते ८ मार्च २०१९ या दरम्यान तालुक्यातील सुरळवाडी, डोंगरगाव ३, डोंगरजवळा, गोदावरीतांडा, पांगरी, मरगीळवाडी, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ २, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, कलेर्वाडी, देवकतवाडी, चिमानाईकतांडा, लिंबेवाडी २, खादगाव, वागदरा ३, वागदरातांडा २, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, खोकलेवाडी अंतर्गत असलेल्या हनुमानवस्ती, ऊंबरवाडी २, रुस्तुमनाईक तांडा, ऊंबरवाडीतांडा, मानकादेवी २, पडेगाव २, डुमनरवाडी, राणीसावरगाव २, खंडाळी २, कौडगाव, धरमनगरी, धनगरमोहा, कातकरवाडी, गौडवाडी, गौळवाडीतांडा, ढेबेवाडी, कासारवाडी, गोपा, पांढरगाव, मालेवाडी, मानकादेवी आदी गावातून विहीर, बोअर अधिग्रहणाचे एकुण ६६ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात गोदावरीतांडा, खंडाळी, पडेगाव व उमलानाईक तांडा या गावातील चार टँकरचा समावेश आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पंचायत समिती कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावांपैकी ३१ विहिरी, बोअर अधिग्रहण व गोदावरी तांडा येथील एका टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ३४ प्रस्तावांपैकी १६ प्रस्ताव पंचायत समितीचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे तर ७ प्रस्ताव मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.११ प्रस्ताव हे त्रुटीत निघाल्याने ग्रामपंचायत कार्यालयाकडे परत पाठविण्यात आले आहेत. चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या विहीर, बोअर, टँकर अधिग्रणाच्या प्रस्तावांची तातडीने चौकशी करून अधिग्रणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.मुळी, मासोळी प्रकल्पासह लघु पाझर तलाव कोरडेठाक४यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीसह छोट्या-मोठ्या नद्या, नाले भरून वाहिले नाहीत. गोदावरी नदी पात्रात मुळी येथे असलेल्या बंधाºयाचे दरवाजे उघडे असल्याने येथे पाणी साचले नाही. परिणामी गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. शहरापासून जवळच डोंगराळ भागात माखणी परिसरात मासोळी नदीवर उभारण्यात आलेल्या मासोळी प्रकल्पातही पाणी साचले नाही. हिवाळ्याच्या प्रारंभीच या प्रकल्पांनी तळ गाठल्याने तालुक्यातील पाणी पातळी खालावली आहे. परिणामी यावर्षी तीव्र पाणीटंचाईची झळ तालुक्याला सोसावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई