शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

परभणी : सातबाराचे पोर्टल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:09 AM

राज्याच्या आॅनलाईन पोर्टलवर स्पेस कमी असल्याने पंधरा दिवसांपासून बंद पडलेले सातबाराचे पोर्टल शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे आॅनलाईन पोर्टलची गतीही वाढली असून, शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्याच्या आॅनलाईन पोर्टलवर स्पेस कमी असल्याने पंधरा दिवसांपासून बंद पडलेले सातबाराचे पोर्टल शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे आॅनलाईन पोर्टलची गतीही वाढली असून, शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत.राज्य शासनाने सातबारा, फेरफार प्रमाणपत्रे आॅनलाईन केल्यानंतर हस्तलिखित प्रमाणपत्रे बंद झाली होती. त्यामुळे शेतकºयांसाठी महत्त्वपूर्ण असलेली ही प्रमाणपत्रे आॅनलाईन काढावी लागत असे. महाभूलेख या संकेतस्थळावरुन ही प्रमाणपत्रे शेतकºयांना मिळत होती. मात्र या पोर्टलवर राज्यभराचा डाटा मोठ्या प्रमाणात साठविल्याने पंधरा दिवसांपासून हे संकेतस्थळ बंद पडले होते. परिणामी शेतकºयांची मोठी गैरसोय झाली. जिल्हा प्रशासनाने हस्तलिखित सातबारा देण्याचे आदेश तलाठ्यांना दिले असले तरी सातबारा मिळविण्यासाठी मोठा वेळ खर्ची घालावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त होते.सध्या पीक कर्ज वाटप, पीक विमा भरण्याची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या दोन्ही कामांसाठी सातबाराची आवश्यकता भासते. मात्र ऐन कामाच्या वेळेसच हे पोर्टल बंद पडल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. पंधरा दिवसांपासून या समस्येने शेतकरी हैराण झाले होते. दरम्यान, हे पोर्टल सुरू करण्यासाठी राज्यस्तरावरुन प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यास यश मिळत नव्हते. अखेर राज्याचा हा संपूर्ण डाटा केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर टाकला असून, तात्पुरत्या स्वरुपात महाभूलेख हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. महाभूलेख हे संकेतस्थळ राज्य शासनामार्फत चालविले जाते. स्टेट डाटा सेंटरवरुन (एसडीसी) त्याचे नियंत्रण होते. या संकेतस्थळाची जागेची मर्यादा संपल्याने ही समस्या निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वी स्टेट डाटा सेंटरवरील सर्व डाटा केंद्र शासनाच्या नॅशनल डाटा सेंटरवर (एन.डी.सी) हलविण्यात आला आहे. त्यामुळे महाभूलेख संकेतस्थळासाठी पुरेसी जागा उपलब्ध झाली आहे. हे संकेतस्थळ आता सुरू झाले असून, जागेचाही प्रश्न मिटला आहे. महाभूलेख संकेतस्थळाची गतीही वाढली आहे.संकेतस्थळ सुरू झाल्याने शेतकºयांना आॅनलाईन संकेतस्थळावरुन सातबारा आणि फेरफार काढता येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.परभणी जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवडसातबारा व फेरफार आॅनलाईन झाल्यानंतर संपूर्ण राज्याचा डाटा या संकेतस्थळावर साठवल्याने दोन महिन्यामध्ये दोन वेळा संकेतस्थळ बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागला. अशी परिस्थती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासन प्रायोगिक तत्त्वावर परभणी जिल्ह्यात पायलट प्रकल्प राबविणार आहे.देशभरातील सर्व महत्त्वाचा डाटा अनलिमिटेड स्पेस असलेल्या क्लाऊड या संकेतस्थळावर साठविलेला असतो. ‘क्लाऊड कम्पुटींग’ या प्रकल्पा अंतर्गत राज्यातील फक्त परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा सर्व डाटा आता ‘क्लाऊड’ या संकेतस्थळावर साठविला जाणार आहे.जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर परभणी जिल्ह्याची या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांकडून शेतकºयांचा डाटा उपलब्ध करुन घेतला असून, या प्रकल्पाच्या पूर्व तपासण्याही झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत राज्यस्तरावरुन निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीमार्फत हे संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे.‘क्लाऊड’वर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने संकेतस्थळ बंद पडण्याचे प्रकार होणार नाहीत. प्रायोगिक तत्त्वावर परभणी जिल्ह्यात हे संकेतस्थळ कशा पद्धतीने चालते, याची तपासणी केल्यानंतर संपूर्ण राज्यातील शेतकºयांचा डाटा ‘क्लाऊड’वर हलविला जाणार असल्याची माहिती मिळाली.गाव नमुनेही संकेतस्थळावरुन‘क्लाऊड’वर डाटा हलविल्यानंतर येत्या काही दिवसांत ग्रामस्तरावर दिला जाणारा ८ अ चा उतारा, १ ते २१ गाव नमुने आणि रेकॉर्ड रुममधून दिले जाणारे जुन्या सातबारा, नकला हे प्रमाणपत्रही आॅनलाईन दिले जाणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटFarmerशेतकरी