परभणी : मंत्रालयातील सचिवांकडून होणार घोटाळ्याची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:27 IST2018-12-01T00:26:23+5:302018-12-01T00:27:07+5:30
जात पडताळणी विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

परभणी : मंत्रालयातील सचिवांकडून होणार घोटाळ्याची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जात पडताळणी विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या संदर्भात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. परभणी जिल्ह्यातील जात पडताळणी विभागातील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गगरानी, हरपालकर, उपायुक्त वंदना कोचुरे व इतर कर्मचाºयांनी दलालांशी संगनमत करुन विद्यार्थी, सरकारी नोकरदार व लोकप्रतिनिधींची आर्थिक लूट केली आहे. खºया लाभार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात बनावट तक्रारी लिहून घ्यायच्या आणि पैसे मिळाल्यानंतर सोयीप्रमाणे प्रकरणे निकाली काढायची, असा प्रकार करुन आर्थिक घोटाळा होत असल्याचे नमूद केले. दोषी अधिकाºयांना निलंबित करावे, अशी मागणीही केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण ‘लोकमत’ने उचलून धरले होते. या वृत्तांवरुनच तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य व आवाका लक्षात घेऊन या प्रकरणाची उच्चपदस्थ अधिकाºयामार्फत चौकशी केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर निलंबनाची पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.