परभणी : धान्य घोटाळ्याचा तपास पडला अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:09 IST2018-01-14T00:09:03+5:302018-01-14T00:09:11+5:30
येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़

परभणी : धान्य घोटाळ्याचा तपास पडला अडगळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़
परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात आॅगस्ट २०१६ मध्ये २८ कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्या प्रकरणी ३७ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला होता़ या प्रकरणातील २३ आरोपींना अटक करण्यात आली़ या सर्व आरोपींना जामीनही मिळालेला आहे़ उर्वरित आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला असून, १४ पैकी ९ आरोपी हे शासकीय अधिकारी आहेत़ तर खाजगी पाच आरोपी आहेत़ ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौºयाच्या वेळी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात वाद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पानसरे यांनी इतर अधिकाºयांना सोपविण्याची विनंती विशेष पोलीस महानिरीक्षकांना केली होती़ त्यानुसार हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना हे प्रकरण तपासासाठी आॅक्टोबर महिन्यात सोपविण्यात आले़ त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांपासून गुंजाळ यांनी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी आहे़ तर परभणीतील एक बडा उद्योजक आहे़ या खाजगी आरोपींना अटक करण्याबाबत गुंजाळ यांना काय अडचण येत आहे? हे समजत नाही़ परभणीहून हिंगोलीकडे तपास वर्ग झाल्यानंतर या तपासाला गती येईल, अशी परभणीकरांची अपेक्षा होती़ परंतु, गुंजाळ यांनी ही अपेक्षा पूर्णत: फोल ठरविली आहे़ विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षांचा कालावधी या प्रकरणाला झाल्यानंतरही एकही संघटना या विरोधात आता बोलत नाही़ परिणामी या प्रकरणातील आरोपी आता उजळमाथ्याने फिरत आहेत़ शिवाय शासकीय सेवेतील निलंबित झालेले अधिकारी सेवेत पुनर्रस्थापित झाले आहेत. तर अन्य आरोपी शासकीय पगार घेऊन आरामात नोकरी करीत आहेत़
वरिष्ठ अधिकाºयांनीही दिले आरोपींना अभय
परभणीच्या धान्य घोटाळ्यात दोन उपजिल्हाधिकाºयांसह तब्बल ९ शासकीय अधिकारी व कर्मचारी आरोपी आहेत़ यातील उपजिल्हाधिकारी कच्छवे व तहसीलदार रुईकर यांना निलंबित करण्यात आले होते़ ते आता शासकीय सेवेत परतले आहेत़ इतर आरोपींबाबतचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अहवाल सादर करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनही या अधिकाºयांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे़ शिवाय पोलीसही या आरोपींना अटक करीत नाहीत़