परभणी :उपविभागीय अधिकारीस्तरावर वाळू लिलावाचे अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST2018-01-07T00:16:22+5:302018-01-07T00:16:27+5:30
महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आले असून जनतेला संबंधित कार्यालयस्तरावर १८०० रुपये ब्रास या शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.

परभणी :उपविभागीय अधिकारीस्तरावर वाळू लिलावाचे अधिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आले असून जनतेला संबंधित कार्यालयस्तरावर १८०० रुपये ब्रास या शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.
जिल्ह्यात महसूल विभागाने अवैधरित्या जप्त केलेल्या ५९ हजार ५९७ ब्रास वाळूचा साठा शिल्लक असतानाही बाजारामध्ये वाळूचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी ५ हजार रुपये ब्रासने वाळूची विक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ६ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वीच उपविभागीय अधिकारीस्तरावर महसूल विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तरीही याबाबत का लिलाव झालेला नाही, याची माहिती घेतली जाईल. जनतेलाही उपविभागीय अधिकारीस्तरावरच १८०० रुपये प्रति ब्रास शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल. यासाठी संबंधितांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही ‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकाºयांनी केले.