शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

परभणी : टंचाई कामांचा दोन कोटींचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:47 IST

मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़ग्रामीण व नागरी भागातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत टंचाईकृती आराखडा मंजूर करून कामे केली जातात़ मागील वर्षी जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्या काळात जिल्हा परिषदेने टंचाई निवारणाची अनेक कामे हाती घेतली़ या कामांच्या खर्चापोटी जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी करण्यात आली होती़ हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला़ विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपयांचा निधी नुकताच वितरित करण्यात आला आहे़मागील वर्षी जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती़ अनेक गावांमध्ये जलस्त्रोत आटल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाची कामे हाती घेतली़ जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, नळ योजनांची दुरुस्ती ही कामे केली़ दरम्यान, टंचाई निवारणाची कामे घेतली असली तरी त्यावर झालेल्या खर्चाला अद्याप मंजुरी मिळाली नव्हती़ त्यामुळे कोट्यवधीची देयके थकीत होती़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला़ त्यास तब्बल एक वर्षानंतर मंजुरी मिळाली असून, हा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला आहे़ निधी वितरित करताना जिल्हाधिकाºयांनी जि़प़ला काही सूचनाही केल्या आहेत़ त्यामध्ये ज्या प्रायोजनासाठी निधीची मागणी नोंदविली, त्याच उपाययोजनांसाठी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी़ हा निधी प्रपंजी लेखाखाते अथवा बँक खात्यात न ठेवता थेट कंत्राटदारांना वितरित केला जाईल, याची दक्षता घ्यावी़ निधीचे वितरण करताना यापूर्वी संबंधित योजनांना निधी वितरित झाला नाही, याची खात्री करावी़ शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या सुरुवातीस ५० टक्के आणि योजना पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के निधी वितरित करणे आवश्यक आहे़ तेव्हा ग्रामीण योजनांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सदर योजना १०० टक्के पूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय संपूर्ण निधी वितरित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़७७६ कामांसाठी वितरित केला निधीजिल्हा परिषदेमार्फत विविध कामे हाती घेतली होती़ त्यामध्ये नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची १९, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची १९९, नवीन विंधन विहिरीसाठी १७५, तात्पुरती पुरक नळ योजनेची ४, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ आणि खाजगी विहीर अधिग्रहणाचे ३२३ कामे मागील वर्षी पूर्ण करण्यात आली होती़ जिल्हाधिकाºयांनी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ८ लाख ५९ हजार ६२९, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी २८ लाख ९१ हजार २९६, नवीन विंधन विहिरींसाठी ९५ लाख ५३ हजार ४२, तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी ११ लाख ५१ हजार ५३३, टँकरसाठी ७९ लाख ५ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले आहेत़लाभार्थ्यांची गैरसोय होणार दूरमागील वर्षीच्या टंचाई काळत कंत्राटदारांनी कामे केली़ परंतु, त्यांची बिले रखडली होती़ यावर्षी देखील टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, आता कामे करताना कंत्राटदारांसमोर अडचणी उभ्या राहत होत्या़ त्यामुळे थकबाकी अदा करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता़ जिल्हाधिकाºयांनी ही संपूर्ण बिले अदा केल्यामुळे कंत्राटदारांना ही बिले मिळणार आहेत़ त्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात नव्याने कामे हाती घेण्यासाठी सोयीचे होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीzpजिल्हा परिषद