परभणी : रेल्वे फाटक पाच तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:55 IST2019-11-11T00:54:56+5:302019-11-11T00:55:03+5:30
रेल्वे रुळाखाली नवीन स्लीपर टाकण्याच्या कामासाठी रविवारी शहरातील कोद्री रेल्वे फाटक पाच तास बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरातील रेल्वे फाटकाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने फाटकाजवळ सोडून पायी प्रवास करावा लागल्याचे पहावयास मिळाले.

परभणी : रेल्वे फाटक पाच तास बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी ) :रेल्वे रुळाखाली नवीन स्लीपर टाकण्याच्या कामासाठी रविवारी शहरातील कोद्री रेल्वे फाटक पाच तास बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरातील रेल्वे फाटकाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने फाटकाजवळ सोडून पायी प्रवास करावा लागल्याचे पहावयास मिळाले.
गंगाखेड येथून परभणी- परळीकडे जाणाºया रेल्वे रुळाचे काम सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये करण्यात आले होते. रेल्वेच्या रुळाखाली असलेले सिमेंटचे स्लीपर हे वीस वर्षानंतर बदलणे अनिवार्य असल्याने रेल्वे प्रशासनातील पूर्णा येथील पी.डब्ल्यू.आय. सुबोधकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेदरम्यान शहरातील कोद्री रेल्वे फाटक बंद ठेवले. या दरम्यान या कालावधीत वडगाव रेल्वे मार्गावर २८८ मीटरपर्यंतचे स्लीपर बदलण्यात आले आहेत. यामुळे सकाळी ११ वाजता परळीकडे जाणारी अकोला - परळी रेल्वे काही वेळ गंगाखेड रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती. शहरातील कोद्री रेल्वे फाटक सुमारे पाच तास बंद राहिल्याने शहराच्या दक्षिण भागातील ममता कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, जनाबाई नगर, कृष्णा नगर, अजिंठा नगर, गौतम नगर, जायकवाडी वसाहत, भंडारी कॉलनी याबरोबर अकोली, खादगाव, कोद्री, बडवणी, डोंगरगाव, माखणी, वाळके पोखर्णी, अंतरवेली मार्गे धमार्पुरी, लातूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. यामुळे शहराच्या दक्षिण भागातील वसाहतीत राहणाºया नागरिकांना रेल्वे फाटकाजवळ आपली वाहने सोडून पायी प्रवास करावा लागला. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूने वाहनांची मोठी गर्दी झाली होती.