Parbhani: Pune jailed for punching on bank customers' money | परभणी : बँक ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारणारा पुण्यात जेरबंद
परभणी : बँक ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारणारा पुण्यात जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बँकांच्या आवारातून हात चालाखी करीत ग्राहकांचे पैसे लाटणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २२ जुलै रोजी पुणे येथून अटक केली असून, या आरोपीने जिल्ह्यात ३ ग्राहकांना लुटल्याची कबुली दिली आहे़
सरफराज मानू इराणी (४३, रा़ इराणी वस्ती, पाटील इस्टेट शिवाजी नगर, पुणे) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे़ पाथरी शहरातील वाल्मिकी अर्बन बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर बँकेतून दिलेल्या पैशांमध्ये काही नोटा फाटक्या आहेत, अशी बतावणी करून त्या ग्राहकाचे २० हजार रुपये लुटल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती़ या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता़ या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने परभणीसह इतर जिल्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच इतर जिल्ह्यातील पोलिसांचीही मदत घेतली़ याच दरम्यान, पुणे येथील पोलिसांना एक व्यक्ती संशयित असल्याचे आढळले़ ही माहिती परभणी पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे जाऊन संशयित इराणी व्यक्तीस ताब्यात घेतले़ त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हा केल्याची कबुली दिली़ तसेच परभणी येथेही एका साथीदाराच्या मदतीने ३ गुन्हे केले असल्याचे त्याने सांगितले़ दरम्यान, आरोपी सरफराज मानू इराणी यास ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलिसांकडे हजर करण्यात आले आहे़ दुसºया आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली़
७० हजारांची केली होती लूट
४आरोपी सरफराज इराणी याने जिल्ह्यात ३ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे़ त्यात पाथरी येथील वाल्मिकी बँकेतील ग्राहकाचे २० हजार ५०० रुपये पळविले होते़
४सेलू शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतून एका ग्राहकाचे १५ हजार रुपये, परभणी शहरातील नवा मोंढा भागातील स्टेट बँकेतून एका ग्राहकाचे ३५ हजार रुपये हातचलाखीने लुटले होते़ या तिन्ही गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे़


Web Title: Parbhani: Pune jailed for punching on bank customers' money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.