परभणी : २५ वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:51 IST2020-01-01T23:50:25+5:302020-01-01T23:51:07+5:30
नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़

परभणी : २५ वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़
३१ डिसेंबर रोजी जिल्हाभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ हा जल्लोष साजरा करीत असताना युवकांचा उत्साह शिगेला पोहचला होता़ या उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविल्या प्रकरणी परभणी शहर वाहतूक शाखेने तब्बल २५ वाहनधारकांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत़ ३१ डिसेंबर रोजी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता़ प्रत्येक पोलीस ठाण्यातील ८० टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत ड्युटी देण्यात आली होती़ तसेच ठिक ठिकाणी गस्तही घालण्यात आली़ नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होवू नये, तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढविला होता़ परभणी शहरात शहर वाहतूक शाखेच्या पथकाने २१ वाहनचालकांवर कारवाई केली आहे़ ट्रिपलसीट वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे पालम, सेलू आणि मानवत या तीन पोलीस ठाण्यााच्या हद्दीत प्रत्येकी १ कारवाई करण्यात आली आहे़ पूर्णा शहरात ताडकळस टी पॉर्इंटवर पोलिसांनी एका वाहन चालकाविरूद्ध कारवाई केली असून, परवाना नसताना वाहन चालविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे़
विनापरवाना दारू विक्री
४वाहनधारकांविरूद्ध कारवाई बरोबरच पोलिसांनी विनापरवाना दारू विक्री करणाºया दोघांविरूद्ध कारवाई केली आहे़ पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या दारूची चोरटी विक्री करीत असताना एका आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ नामदेव मारोतराव डुबे असे आरोपीचे नाव आहे़ त्याच्या ताब्यातून १२७० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़ गंगाखेड शहरात अवैधरित्या दारू विक्री करणाºया एका महिलेविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली असून, या महिलेच्या ताब्यातून २५० रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे़
डंÑक अँड ड्राईव्हच्या केसेस
४३१ डिसेंबर रोजी शहर वाहतूक शाखेच्या वतीने ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत २० दुचाकी चालक, १ आॅटोरिक्षा आणि १ टिप्पर अशा २२ वाहनांवर कारवाई केली आहे़