शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

परभणी : कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:01 IST

महानगरपालिकेत लिपिक संवर्गात सेवेत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या असून, पदोन्नतीच्या माध्यमातून मिळणाºया वाढीव वेतनाच्या लाभापासून कर्मचाºयांना वंचित रहावे लागत आहे़ प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून पदोन्नतीचे लाभ द्यावेत, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेत लिपिक संवर्गात सेवेत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या असून, पदोन्नतीच्या माध्यमातून मिळणाºया वाढीव वेतनाच्या लाभापासून कर्मचाºयांना वंचित रहावे लागत आहे़ प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून पदोन्नतीचे लाभ द्यावेत, अशी मागणी होत आहे़परभणी महानगरपालिकेमध्ये सुमारे ९५० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत़ अनेक पदे सद्यस्थितीला रिक्त असून, नवीन भरती प्रक्रिया राबविली नसल्याने उपलब्ध कर्मचाºयांवरच महापालिकेचे कामकाज चालविले जाते़ उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंता यासह विभाग प्रमुखांची अनेक पदे रिक्त आहेत़ या पदांवर मनपा अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांनाच तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देवून काम करून घेतले जात आहे़ मात्र ज्या पदावर हे कर्मचारी काम करतात़ त्या पदाचे वेतन न मिळता मूळ पदाचेच वेतन कर्मचाºयांना मिळत आहे़ त्यामुळे मोठी जबाबदारी सांभाळत असताना वेतनाच्या बाबतीत मात्र कर्मचाºयांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली असून, पदोन्नतीसह वेतनातही त्या पदानुसार ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे़अनेक विभाग प्रमुखांची जबाबदारी तृतीय श्रेणी कर्मचारी सांभाळत आहेत़ त्यामुळे जबाबदारी वाढली तशी वेतनातील तरतूद मात्र वाढत नसल्याचे दिसत आहे़ मागील काही वर्षांपासून महानगरपालिकेत पदभरती झाली नाही़त्यामुळे रिक्त पदावर तात्पुरत्य स्वरुपात कर्मचाºयांना पदोन्नती देऊन कामकाज पार पाडले जात आहे़ महापालिकेतील २८ लिपिक वर्गीय कर्मचारी दुसºया कालबद्ध पदोन्नतीसाठी पात्र आहेत; परंतु, या कर्मचाºयांना वेळेत पदोन्नती मिळाली नाही़ त्यामुळे त्यांच्या वेतनातही फरक आला असून, पदोन्नतीच्या वेतनापासून कर्मचाºयांना वंचित राहावे लागत आहे़पदोन्नतीसाठी पात्र असणाºया कर्मचाºयांपैकी काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरीही त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नसल्याने कर्मचाºयांत नाराजीचा सूर आहे़ महानगरपालिकेतील विभाग प्रमुखांच्या रिक्त पदांची संख्या पाहता दुसºया कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देवून कर्मचाºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़३५ विभागप्रमुख तात्पुरत्या स्वरुपात४महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कामकाज सांभाळण्यासाठी ३५ विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मात्र मनपातील रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने बहुतांश विभागप्रमुख हे अतिरिक्त कारभार पाहत आहेत़ पदोन्नतीचा लाभ मिळाला नसला तरी जबाबदारीने मात्र पदभार मिळाला आहे. या कर्मचाºयांना मूळ पदाचे वेतन घेत काम मात्र पदोन्नतीच्या पदाचे करावे लागत आहे़ ही अडचण दूर करण्यासाठी अधिकाºयांची रिक्त पदे त्वरित भरावीत किंवा कर्मचाºयांना त्यांच्या पदानुसार वेतन द्यावे, अशी मागणी होत आहे़वरिष्ठांनी पाठपुरावा करण्याची गरज४महानगरपालिकेतील २८ लिपिकवर्गीय कर्मचाºयांच्या कालबद्ध पदोन्नतीसाठी वरिष्ठ अधिकाºयांनी पाठपुरावा करून कर्मचाºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे़४लिपिक वर्गीय कर्मचाºयांना इतर पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्याने दोन टप्प्यात कालबद्ध पदोन्नती दिली जाते़ महापालिकेतील या कर्मचाºयांना पहिल्या टप्प्यातील पदोन्नती मिळाली आहे; परंतु, सेवेचे २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिल्या जाणाºया पदोन्नतीचा लाभ अद्याप मिळाला नाही़४ त्यामुळे कर्मचाºयांचे नुकसान होत असून, मनपातील वरिष्ठ अधिकाºयांनी पाठपुरावा करून कर्मचाºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका