परभणी : आठवडाभरात होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:20 IST2018-02-18T00:20:19+5:302018-02-18T00:20:25+5:30

गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे एका आठवड्यात पूर्ण होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़

Parbhani: Panchnama will be done in a week | परभणी : आठवडाभरात होणार पंचनामे

परभणी : आठवडाभरात होणार पंचनामे

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे एका आठवड्यात पूर्ण होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़
गारपिटीमुळे सुमारे ५८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत या पिकांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे केले जात आहेत़ ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Parbhani: Panchnama will be done in a week