परभणी : एक हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:56 IST2018-10-08T23:56:28+5:302018-10-08T23:56:55+5:30

परभणी : एक हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : मागील खरीप हंगामात तालुक्यातील कापूस पिकावर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील १ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
सोनपेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम हा प्रमुख आहे. या हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही नगदी पिके म्हणून ओळखली जातात.
शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना घटते उत्पादन, मजुरीचा वाढलेला दर व बाजारात मिळणारा अल्पदर या समस्यांना तोंड देता देता नाकी नऊ येत आहे. त्यातच गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस पिकावर शेंद्री बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये हजारो शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.
कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकºयांना अनुदान देण्याचे जाहीर केले; परंतु, तालुक्यातील ६२ गावांपैकी विटा, वाणीसंगम, वैतागवाडी या तीन गावातील १ हजार ४७ शेतकºयांना ६० लाख २९ हजार १६० रुपयांच्या अनुदान निधीची प्रतीक्षा आहे.
याबाबत तहसीलदार जीवराज डापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोंडअळीचे अनुदान शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे सांगितले.
४९ गावांतील शेतकºयांना मिळाले अनुदान
बोंडअळीने बाधित झालेल्या पहिल्या टप्प्यातील १९ गावांतील ८ हजार ८४३ शेतकºयांना ४ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. दुसºया टप्प्यात ३० गावांतील १५ हजार ८९५ शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत पहिल्या व दुसºया टप्प्यात तालुक्यातील ४९ गावांतील शेतकºयांना अनुदान वाटप झाले आहे. आता तिसºया टप्प्यातील १ हजार ४७ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.