परभणी : खून प्रकरणात आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:20 IST2018-05-07T00:20:38+5:302018-05-07T00:20:38+5:30
व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीस अटक केली असून आता या प्रकरणात पाच आरोपी अटक झाले आहेत़

परभणी : खून प्रकरणात आणखी एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीस अटक केली असून आता या प्रकरणात पाच आरोपी अटक झाले आहेत़
जवाहर कॉलनी भागातील शेख अल्ताफ याचा व्याजाचे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना ४ मे रोजी घडली होती़ या प्रकरणी शेख एजाज शेख कालू यांच्या फिर्यादीवरून सलीम फारुखी, सलाउद्दीन फारुखी, तब्बन फारुखी, शेख साबेर यांच्याविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांनी या प्रकरणात रविवारी सलीम खान मुसा खान या आरोपीस गंगाखेड रोड भागातून ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, जमादार अशोक सोडगीर, सय्यद उमर, संजय पुरी यांनी ही कारवाई केली़ या प्रकरणात आता पाच आरोपींना झाली आहे. दरम्यान, शनिवारी अटक केलेल्या मिर्झा शकील बेग व म़ पाशा राज या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आणखी आरोपी गुंतल्याची शक्यता असून, पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.