परभणी : दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:22 IST2018-03-04T00:22:12+5:302018-03-04T00:22:38+5:30
पालम ते लोहा राज्य रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

परभणी : दुचाकी अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): पालम ते लोहा राज्य रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तालुक्यातील आईनवाडी येथील तुळशीदास बापुराव शिंदे (४७) हे पेठशिवणीहून दुचाकीने आईनवाडीकडे जात होते. त्यावेळी आईनवाडी फाट्यावर लोह्याकडे जाणाºया एका चारचाकी गाडीने (एम.एच.२९ एआर ३२१२ ) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात तुळशीदास शिंदे जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.