शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

परभणी : टंचाई निवारणासाठी आता ३८ विंधन विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:39 AM

जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्हावासिय पाण्यासाठी त्रासून गेले आहेत. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिकच गंभीर असल्याने विविध उपाययोजना करुन पाणी टंचाई निवारण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत. टँकर, विहिरींचे अधिग्रहण, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती इ. कामे जिल्ह्यात सुरू झाली आहेत. काही भागात पाण्याचा कुठलाच स्त्रोत उपलब्ध नसल्याने नवीन विहिरी घेण्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन आता विंधन विहिरी घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात विहिरींची कामे सुरू होतील.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून नवीन विंधन विहिरी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे प्राप्त झाले होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सहायक भूवैज्ञानिकांनी तपासणी करुन खर्च व तांत्रिक बांबी तपासल्या असून, तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनीही शिफारस केल्याने ३८ नवीन विंधन विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.एका विहिरीवर साधारणत: ५८ हजार १९६ रुपयांचा खर्च लागणार असून नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी टंचाईवरील ताण काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत सर्वच तालुक्यांत टंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता मंजुरी मिळालेल्या विहिरींची कामे तातडीने हाती घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.तीन दिवसांत : पूर्ण करावे लागणार काम४नवीन विंधन विहिरींना मंजुरी देताना जिल्हाधिकाºयांनी काही अटी घालून दिल्या आहेत. निश्चित केलेल्या ठिकाणीच विंधन विहीर घ्यावी, विंधन विहिरींचे काम हातपंप उभारणीसह तीन दिवसंत पूर्ण करावे आणि तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, वाडी, वस्ती, तांडा यांची लोकसंख्या किमान ५० असावी.४नवीन विंधन विहिरींच्या परिसरात १ कि.मी. अंतरापर्यंत कोणत्याही पिण्याच्या पाण्याचे उद्भव असू नयेत, ६० मीटर खोलीपर्यंतच ही विंधन विहीर घेण्याचेही बंधन टाकण्यात आले आहे. २०० लोकसंख्येमागे एक विंधन विहीर घ्यावी. त्यानुसार गावाच्या लोकसंख्येच्या आणि पूर्वी घेतलेल्या आणि सद्यस्थितीत जिवंत विंधन विहिरींच्या संख्येचा विचार करुन नवीन विंधन विहिरीचे काम सुरू करावे.या गावांत होणार विंधन विहीर४मानवत तालुक्यात आंबेगाव (बु), थार, सारंगपूर, गंगाखेड तालुका- मसला, राणीसावरगाव, पाथरी तालुका - पाथरगव्हाण बु. (२), बाबुलतार, पोहेटाकळी, देगाव, विटा, लिंबा बनेवस्ती, बाभळगाव, गुंज खु., ढालेगाव.४पूर्णा तालुका- आवलगाव, कलमुला, एकरुखा, पेनूर, गौर, शिरकळस, हाटकरवाडी, धानोरा मोत्या, कावलगाव वाडी, फुलकळस, खडाळा, परभणी तालुका - पिंपळा, जलालपूर, खानापूर, बाभुळगाव, आंबेटाकळी, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, मांडवा, डफवाडी, मोहपुरी, पाथरा.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ