परभणी :१९६ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:00 IST2019-10-16T00:00:32+5:302019-10-16T00:00:58+5:30
निवडणूक विभागाच्या दुसºया प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील १९६ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

परभणी :१९६ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निवडणूक विभागाच्या दुसºया प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील १९६ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
१३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणासाठी जिंतूर विधानसभा मतदार संघातील ५३, परभणी विधानसभा मतदारसंघातील २०, गंगाखेड मतदार संघातील ६२ आणि पाथरी मतदार संघातील २० असे १९६ कर्मचारी गैरहजर राहिल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, या गैरहजर कर्मचाºयांना निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. या कर्मचाºयांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर ज्यांचा खुलासा संयुक्तिक वाटणार नाही, अशा कर्मचाºयांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे रुजू व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिल्या आहेत.