शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेलेला माणूस दंगल करायला कसा आला? 'FIR'मधील 'तो' घोळ उघड अन् नवरदेवाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 20:03 IST

मृताच्या नावे गुन्हा अन् नवरदेवाच्या हाती बेड्या; बोरी दंगल प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

जिंतूर (जि.परभणी) : एकीकडे लग्नाची लगबग आणि दुसरीकडे कारागृहातील बंदिवास अशा कात्रीत सापडलेल्या स्वप्निल संजय शिंपले या तरुणाला परभणी सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून, त्याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तर याच प्रकरणात चक्क मयत असलेल्या व्यक्तीचा एफआयआरमध्ये समावेश असल्याचा धक्कादायक प्रकारसुध्दा समोर आला आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पुतळा स्थापनेप्रसंगी १९ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास दंगल झाल्याचे नमूद करीत पोलिसांनी २० फेब्रुवारीला ४६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या एकूण १३ कलमांखाली बोरी ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. यात सरकारी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यापासून ते दंगल घडवण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्यापर्यंतचे गंभीर आरोप लावून पोलिसांनी आरोपींची नाकेबंदी केली होती. संशयित म्हणून स्वप्निल शिंपले या तरुणास २० फेब्रुवारीला दुपारी अटक करून त्याच दिवशी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. 

वकिलांनी केला जोरदार युक्तिवादत्यानंतर त्याने ॲड. सुनील बुधवंत यांच्यामार्फत जामिनासाठी परभणी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांनी न्यायालयासमोर धक्कादायक पुरावा सादर केला. ज्यात पोलिसांनी एफआयआरमध्ये ज्या आरोपी क्रमांक ४२ (लक्ष्मण माटे) याच्यावर दंगलीचे आणि हल्ल्याचे कलम लावले आहे, त्या व्यक्तीचे निधन १४ नोव्हेंबर २०१५ रोजीच झाले आहे. जो माणूस १० वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेला, तो दंगल करायला आणि पोलिसांवर हल्ला करायला प्रत्यक्ष हजर कसा असू शकतो?" असा मुद्दा मांडत त्यांनी दाखल एफआयआरमध्ये आरोपींची नावे ही यांत्रिकी आणि मनमानी पद्धतीने गोवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच स्वप्निल शिंपले या तरुणाचा विवाह ५ मार्च रोजी होणार असून, लग्नघटिका जवळ असताना पोलिसांनी कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ संशयावरून स्वप्निलला अटक केली असून, ज्या तपासात पोलिसांना जिवंत आणि मृत व्यक्तीमधील फरक कळत नाही, त्या तपासाच्या आधारे एका नवरदेवाला तुरुंगात डांबणे हा त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर होत असलेला सामाजिक अन्याय आहे, असा मुद्दा संवेदनशीलपणे न्यायालयाला पटवून दिला.

या प्रकरणात सरकारी वकिलांनीसुद्धा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांच्या एफ.आय.आर.मधील विसंगती पाहता, परभणी सत्र न्यायालयाने २४ फेब्रुवारीला स्वप्निल शिंपले याला जामीन मंजूर केला. ॲड. सुनील बुधवंत यांना या प्रकरणात ॲड. भगवान घुगे, ॲड. महेश वाघमारे यांनी सहकार्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dead man in riot FIR; groom gets bail!

Web Summary : Groom gets bail after dead man named in riot FIR. FIR inconsistencies highlighted by advocate; court grants bail.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीCourtन्यायालय