परभणी : परस्पर मीटर बदलले; तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:13 IST2019-02-24T00:12:42+5:302019-02-24T00:13:12+5:30
वीज वितरण कंपनीचे मीटर परस्पर बदलल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बोरी आणि कौसडी येथील तिघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी : परस्पर मीटर बदलले; तिघांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: वीज वितरण कंपनीचे मीटर परस्पर बदलल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बोरी आणि कौसडी येथील तिघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुधाकर जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी कौसडी येथे मीटर तपासणी करीत असताना शिवनारायण जैस्वाल यांच्या घरी अवैधरित्या विद्युत मीटर बदलले असल्याचे लक्षात आले. तर २१ फेब्रुवारी रोजी बोरी येथे तपासणी केली असता अरुण लोखंडे यांनीही परस्पर अज्ञात व्यक्तीकडून मीटर बदलून घेतल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी सहाय्यक अभियंता सुधाकर जाधव यांनी तपासणीनंतर जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शिवनारायण जैस्वाल, अरुण लोखंडे यांच्यासह अन्य एकाविरुद्ध विद्युत कायदा २००३ अन्वये जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.