शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

परभणी मनपाचा ७० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:59 IST

येथील महानगरपालिकेचा ६९ लाख ६५ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुनील देशमुख यांनी शनिवारी आयोजित बैठकीत सादर केला़ या अर्थसंकल्पास सभागृहाने चर्चेद्वारे मंजुरी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेचा ६९ लाख ६५ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुनील देशमुख यांनी शनिवारी आयोजित बैठकीत सादर केला़ या अर्थसंकल्पास सभागृहाने चर्चेद्वारे मंजुरी दिली़शहरातील महानगरपालिकेच्या बी़ रघुनाथ सभागृहात शनिवारी मनपाच्या अर्थसंकल्पीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर सभापती सुनील देशमुख, प्रभारी आयुक्त डॉ़ विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी गणपत जाधव, अंतर्गत लेखा परीक्षक एम़बी़ राठोड, सहाय्यक लेखा परीक्षक मंजूर हसन, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे आदींची उपस्थिती होती़ यावेळी सभापती देशमुख यांनी अर्थसंकल्प सादर करीत असताना महानगरपालिकेकडे दरवर्षी विविध माध्यमातून ५३३ कोटी १९ लाख ३३ हजार ३९१ रुपये जमा होतात़ त्यापैकी ५३२ कोटी ४९ लाख ६८ हजार ५४ रुपये विविध विकास कामे व प्रशासकीय बाबींवर खर्च होतात़ उर्वरित ६९ लाख ६५ हजार ३३७ रुपये शिल्लक राहतील, अशी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणे महाराणा प्रताप चौक पुतळा परिसराचे तसेच शहीद अब्दुल हमीद, वसंतराव नाईक पुतळा परिसराचे सुशोभीकरण करावे व यासाठी १० लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली़ प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील रस्ता कामांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली़उड्डाणपूल, वसमत रोड, जिंतूर रोड या रस्त्यावर दुभाजकात पोल उभारून विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित केल्याचे सभापती देशमुख यांनी सांगितले़ नगरसेवक डॉ़ विद्या पाटील यांनी जेथे पाणीटंचाई जाणवत आहे तेथे टँकर सुरू करावेत तसेच शहरातील हातपंप दुरुस्त करावेत, अशी मागणी केली़ यावेळी चर्चेत नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, एस़एम़ अली पाशा, इम्रान हुसेनी, नाजनीन पठाण, प्रशास ठाकूर, अतुल सरोदे आदींनी सहभाग घेतला़असे आहेत : मनपाचे नवीन वर्षात संकल्प४नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने विविध कर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार, यासाठी साडेपाच कोटींची तरतूद़ शहराची पाणीपुरवठा योजना सप्टेंबर २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करून प्रति दिन प्रतिमाणशी १३५ लिटर (सध्या ७५ लिटर) पाणी उपलब्ध करून देणाऱ४शहरातील पथदिवे अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने चालू-बंद करण्याची यंत्रणा उभारणार, यासाठी १ कोटी ७५ लाखांची तरतूद़ मनपाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी अडीच कोटींची तरतूद, नवीन नाट्यगृहासाठी १० कोटी मिळाले आहेत़ आणखी ५ कोटींची तरतूद़

टॅग्स :parabhaniपरभणीBudgetअर्थसंकल्पCorruptionभ्रष्टाचार