परभणी : पेन्शन धारकांचे दिल्लीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:07 IST2018-11-15T00:06:22+5:302018-11-15T00:07:17+5:30
३५ ते ४० वर्षे नोकरीत अंशदान करूनही तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़

परभणी : पेन्शन धारकांचे दिल्लीत आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ३५ ते ४० वर्षे नोकरीत अंशदान करूनही तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़
ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीेने पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे़ त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने ७ नोव्हेंंबर रोजी बुलडाणा येथे ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात परभणीतील कोषाध्यक्ष अब्दुल खदीर, डी़एम़ पारवे, मधुकर मस्के, माधव हतागळे आदी सहभागी झाले होते़ आता या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राष्ट्रीय पातळीवर दिल्ली येथे ४ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे़ या आंदोलनात २८ राज्यातील पेन्शनधारक सहभागी होणार आहेत़ आंदोलनात सहभागी होण्यासाठी मधुकर मस्के यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़