परभणी : व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:39 IST2019-08-17T00:38:42+5:302019-08-17T00:39:01+5:30
शहरातील ममता कॉलनी येथील मनपाच्या जलकुंभाचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या संदर्भातील दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

परभणी : व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील ममता कॉलनी येथील मनपाच्या जलकुंभाचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या संदर्भातील दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
शहरातील ममता कॉलनी भागात महानगरपालिकेचा जलकुंभ आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या जलकुंभातील व्हॉल्व्ह फिरवून पाणी सोडत असताना तो गंजून गेल्याने तुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरु झाला. मुख्य व्हॉल्व्ह तुटल्यानेच पाणी वाहून जात असताना मनपाचे अधिकारी हातबल झाले. हे पाणी या भागातील रस्त्यांवरुन वाहताना दिसून आले. तसेच काही नागरिकांच्या घरातही हे पाणी गेले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दिवसभर यातील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम सुरु होते. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात अधिक माहितीसाठी मनपाचे अभियंता वसीम पठाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.