परभणी :मराठवाडा प्लॉट भागात सव्वा लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:45 IST2019-07-09T23:43:54+5:302019-07-09T23:45:05+5:30
शहरातील एका गोदामात साठवलेला १ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता पकडला असून, याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परभणी :मराठवाडा प्लॉट भागात सव्वा लाखाचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील एका गोदामात साठवलेला १ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता पकडला असून, याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील एका गोदामात गुटख्याचा साठा केल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. त्याअधारे या पथकाने सोमवारी रात्री सापळा लावला होता. या कारवाई दरम्यान मदनी मोहम्मद मारफानी हा व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याच्या ताब्यातून ३७ हजार ९५० रुपये किंमतीचे विष्णू टोबॅको प्रॉडक्ट चंगोरा अहमदाबाद लेबल असलेले पिवळ्या रंगाचे तंबाखूचे ११५० पुडे, १० हजार २९६ रुपयांचे याच प्रकारचे निळ्या रंगाचे २३४ पुडे, २४ हजार रुपयांचा केसरयुक्त राजासाब उत्पादक रुद्राष फ्रेगन्स इंडस्ट्रीयल गाजियाबाद या लेबलचे पानमसाल्याचे २०० पुडे, चिविंग तंबाखूचे १४२ पुडे (किंमत ४ हजार २६० रुपये), ५० हजार रुपये किंमतीचा पोत्यात असलेला ७५ किलो खुला पान मसाला, केसरयुत विमल पान मसाला आणि रोख ५ हजार २०० रुपये असा १ लाख २७ हजार ५६८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन ९ जुलै रोजी मदनी मोहम्मद मारफानी याच्याविरूद्ध नानलपेठ ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.