शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:18 AM

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलूलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पीजी वसतिगृहाशेजारील मैदानावर आयोजित परभणी जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु बोलत होते़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालक डॉ़ पी़जी़ इंगोले, संशोधन संचालक डॉ़ डी़पी़ वासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे संचालक के़ आऱ सराफ यांची उपस्थिती होती़कुलगुरु व्यंकटेस्वरलू म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत उत्पादन घेत असतात़ परंतु, त्यांना मार्केटींगचे तंत्र अवगत नसल्याने उत्पन्नात वाढ होत नाही़ सर्व शेतकऱ्यांनी मार्केटींगचे तंत्र शिकून घेणे महत्त्वाचे आहे़ यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल़ शेतकºयांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी नवीन संशोधन केंद्र विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात येणार आहे़ यामध्ये शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातून संशोधन केले जाणार आहे़ जिल्हा कृषी महोत्सवात सेंद्रिय शेती उत्पादक गट आणि महिला गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाचा धान्य महोत्सव भरविण्यात आला असून, त्याचा प्रचार व प्रसार करून ग्राहकांना आकर्षित करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर म्हणाले, शेतकºयांनी आपले उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, उत्पन्नाचे ग्रेडींग व पॅकेजिंग करून आॅनलाईन शेतीमाल विकल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल़ कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले़ डीपीडीसीच्या निधीतून सुपरमार्केटची इमारत उभी केली जाणार असून, याचा शेतकरी वर्गाला फायदा होईल़ यावेळी बोलताना विभागीय कृषी सहसंचालक भताने म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक ज्ञानगंगा शेतकºयांच्या दारी आली आहे़ महोत्सवात मिळणारे ज्ञान अमूल्य आहे. यावेळी महापौर वरपूडकर, जि़प़ उपाध्यक्षा नखाते, देशमुख यांचीही भाषणे झाली़उल्लेखनीय कार्य करणाºया शेतकºयांचा गौरवया महोत्सवात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी ज्ञानोबा चट्टे, जितेंद्र देशमुख, अशोक देशमुख, सुरेश वाकणकर, विठ्ठल गिराम, हरिभाऊ निकम, सोपान आवचार, साहेबराव काकडे, मधुकर घुगे, तुकाराम दहे, सूर्यकांत देशमुख, शेषराव निरस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़ महोत्सवातील प्रदर्शनात कृषी, सहकार, महसूल, समाजकल्याण, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशू संवर्धन आदी विभागांची दालने उभारण्यात आली आहेत़ हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे़

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीuniversityविद्यापीठagricultureशेती