शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

परभणीत हॅट्ट्रिक की रासपची मुसंडी?; दुरंगी लढतीत मतविभाजन ठरणार कळीचा मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 10:09 AM

निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३४ उमेदवार आहेत. वंचितने ऐनवेळी इथून उमेदवार बदलला

ज्ञानेश्वर भाले

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात शिवाजीराव देशमुख वगळता आजपर्यंत कुणालाच तिसऱ्यांदा खासदार होता आले नाही. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना देशमुख यांच्या हॅट्रिकशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

उद्धव सेनेचे जाधव प्रत्येकी दोन वेळा आमदार, खासदार असल्याने त्यांची मतदार संघावर पकड आहे. तर दुसरीकडे रापसच्या जानकर यांच्या पक्षाचा मतदार संघात एक आमदार असून महायुतीचे आमदार, पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी राबताना दिसत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३४ उमेदवार आहेत. वंचितने ऐनवेळी इथून उमेदवार बदलला. हा उमेदवार किती मते घेणार म्हणजेच कुणाची आणि किती मते खाणार हा मुद्दा देखील कळीचा ठरणार आहे. यावरच विजयी कोण होणार हे ठरेल, अशीच सध्याची परिस्थिती आहे.

राजकीय पक्षाचे चिन्ह या निवडणुकीतून गायबराज्यातील राजकीय घडामोडींमुळे ४० वर्षानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण तर २५ वर्षानंतर राष्ट्रवादीचे प्रचलित घड्याळ चिन्ह या निवडणुकीतून गायब झालेत. त्यामुळे मतदारांना आपले मत देण्यासाठी योग्य उमेदवार आणि त्याच्या नवीन चिन्हाची ओळख करून घेत मतदान करावे लागणार आहे. परभणी मतदार संघामधील सहा विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३०० गावात निवडणूक रिंगणातील ३४  उमदेवारांना त्यांचे नवीन चिन्ह घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यात १३ उमेदवार विविध पक्षाचे तर २१ जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न प्रलंबित असून कृषी विद्यापीठात अनेक प्रश्नांवर सकारात्मक विचार झालेला नाही, त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. रेल्वे जंक्शन विकास, नवीन प्लॅटफाॅर्म निर्मिती, पुर्णा येथील डिझेल लोकोशेड, यार्डचा प्रश्न, दुहेरीकरणाचे परभणी-जालना मार्गाचे काम अपेक्षित. मनपातंर्गत रस्ते, भुमिगत गटार योजना, नाट्यगृह निर्मितीचा निधी, नवीन औद्योगिक वसाहत, समांतर जलवाहिणीचा प्रश्न मार्ग लागणे आवश्यक. भाजपचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांची कोंडी आदी.  

अनेक नेतेमंडळींच्या अपेक्षांवर पाणी अजित पवार गटाने जागा रासपला सोडल्याने धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह असणाऱ्या मतदार संघातील अनेक बड्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. महायुतीचे जानकर यांचे प्रभाव क्षेत्र मतदार संघात नाही. वरिष्ठ पातळीवरून जातीय समीकरणे जुळवत त्यांना जागा सोडण्यात आली आहे.  

टॅग्स :parbhani-pcपरभणीMahadev Jankarमहादेव जानकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४