शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

परभणी : डाव्या कालव्याचे पाणी नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:13 AM

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याने सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असून, हे पाणी नदीपात्रातून ढालेगाव, झरी, खडका आणि डिग्रस बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या भागातील प्रमुख शहरांबरोबरच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता निकाली निघाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याने सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असून, हे पाणी नदीपात्रातून ढालेगाव, झरी, खडका आणि डिग्रस बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या भागातील प्रमुख शहरांबरोबरच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता निकाली निघाला आहे़जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने ओढे, नाले, बंधारे कोरडेठाक आहेत़ परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे़ पावसाळ्यात बंधारे आणि प्रकल्प पाण्याने भरणे अपेक्षित होते़ मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अजूनही कायम आहे़या सर्व पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालवा आणि नदीपात्रात सोडावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत होती़या मागणीची दखल घेत जायकवाडी पाटबंधारे विभागाने कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी नोंदविली होती़ त्यानुसार जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने सोडलेले पाणी १६ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील वरखेड (ता़ पाथरी) येथील गेटपर्यंत पोहचले आहे़ या ठिकाणावरून जिल्ह्यातील विविध बंधाऱ्यांत पाणी सोडले जात आहे़जायकवाडी डाव्या कालव्यातून पाथरी आणि मानवत या दोन शहरांच्या पिण्याच्या पाण्याची मागणी नोंदविण्यात आली होती़ त्यानुसार मानवत शहराला पाणीपुरवठा करणाºया झरी तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जाणार असून, पाथरी शहराला पाणीपुरवठा करणाºया ढालेगाव बंधाºयात ३़३६ दलघमी पाणी दिले जाणार आहे़पाथरी शहराला वर्षभरासाठी ३़३६ दलघमी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असल्याने हे पाणी बंधाºयात सोडले जाणार आहे़ १६ आॅगस्ट रोजी डाव्या कालव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी आता ढालेगाव बंधाºयापर्यंत पोहचत आहे़ जायकवाडी प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यात दाखल झाल्याने पाथरी, मानवत, पालम या प्रमुख शहरांबरोबरच ढालेगाव बंधाºयावर आधारित असलेल्या रामपुरी, ढालेगाव, निवळी, मरडसगाव, मंजरथ, पाटोदा, गोपेगाव, नाथ्रा या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़ पाथरी, मानवत या दोन्ही तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे़संपूर्ण पावसाळ्यात एकदाही मोठा पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती असून, जायकवाडीच्या पाण्यामुळे या गावांना दिलासा मिळाला आहे़ शिवाय परिसरातील पाणी पातळी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे़परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी ५ दलघमी४परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी ५ दलघमी पाण्याची मागणी नोंदविण्यात आली असून, या औष्णिक विद्युत केंद्रासाठी परभणी जिल्ह्यातील डाव्या कालव्याच्या १५९ सीआर गेटवरून ३७५ क्युसेसने खडका बंधाºयात पाणी सोडण्यात आले आहे़४गेटपासून खडका बंधारा साधारणत: ४० किमी अंतरावर असून, ५ दलघमी पाणी देण्यासाठी या बंधाºयात २० दलघमी पाणी सोडले जाणार आहे़झरी तलावात ६२ टक्के पाणीमानवत शहराला पाणी पुरवठा करणाºया झरी येथील तलावात २०० क्युसेसने पाणी सोडले जात आहे़ १़८७ दलघमी क्षमतेचा हा तलाव पूर्णपणे भरला जाणार आहे़ सध्या या तलावात १़१ दलघमी पाणीसाठा जमा झाला असून, ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे़डाव्या कालव्यातूनच ढालेगाव बंधाºयातही पाणी दिले जात आहे़ ढालेगाव बंधाºयासाठी १५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे़ कालव्यातील पाणी २०० क्युसेसने सोडले तर वरखेड गावाजवळील पुलावरून पाणी जाते़ त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी १५० क्युसेसने ढालेगाव बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले असून, नदीपात्रातून हे पाणी बंधाºयात दाखल होत आहे़ढालेगावच्या बंधाºयाचे बॅक वॉटर २२ किमी अंतराचे असून, १३़५५ दलघमी क्षमताचा हा बंधारा असला तरी बंधाºयात केवळ ३़३६ दलघमी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागातून देण्यात आली़डिग्रस, खडका : बंधाºयासाठीही पाणी४डाव्या कालव्यातून निघालेले पाणी पालम तालुक्यातील डिग्रस आणि सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाºयातही सोडले जाणार आहे़ डिग्रस हा उच्च पातळी बंधारा असून, ६३़५५ दलघमी क्षमतेचा हा बंधारा आहे़४या बंधाºयात १़५१ दलघमी पाणी सोडले आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील १८७ सीआर या गेटमधून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, गेटपासून बंधाºयाचे अंतर २० किमी एवढे आहे़४त्यामुळे डिग्रस बंधाºयातील पाण्यावर अवलंबून असणाºया अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प