परभणीत व्याख्यान : बदलत्या अर्थकारणामुळे मोठे फेरबदल- चंद्रशेखर टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:44 IST2018-01-10T00:44:30+5:302018-01-10T00:44:34+5:30
केंद्र शासनाने चलन नि:श्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील अर्थकारण बदलत चालले असून, समाजकारणातही मोठे फेरबदल होत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले़

परभणीत व्याख्यान : बदलत्या अर्थकारणामुळे मोठे फेरबदल- चंद्रशेखर टिळक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाने चलन नि:श्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील अर्थकारण बदलत चालले असून, समाजकारणातही मोठे फेरबदल होत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले़
येथील गणेश वाचनालयात ५ जानेवारी रोजी कै़ मुकूंदराव पेडगावकर स्मृतीप्रित्यार्थ आयोजित व्याख्यानात ‘बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण’ या विषयावर टिळक बोलत होते़ यावेळी प्राचार्या संध्याताई दुधगावकर, शैलेश मंडलिक, संस्थेचे संचालक विनय पराडकर, आनंद देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ टिळक म्हणाले, बदलत्या काळात समाजातही आर्थिक फेरबदल घडून येत आहेत़ सर्व व्यवहार डिजिटल होत असून, युवकांना या व्यवहारांची सवय होत आहे़
मात्र जुन्या पिढीला हे व्यवहार अवघड जात आहेत़ परंतु, बदलत्या काळानुसार प्रत्येकाने बदल स्वीकारला पाहिजे़ आज भुतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानाचा विचार अर्थकारणाने होऊ लागला आहे़, असेही टिळक म्हणाले़ या कार्यक्रमात सुधाकर पेडगावकर लिखित ‘बकुळीची फुले’ या कथासंग्रहाचे व अभय पेडगावकर लिखित ‘लिंबू म्हणे टिंबू’ व ‘सूर्याला आले पडसे’ या एकांकी संग्राहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़