परभणी: रेणाखळी येथे हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:53 IST2019-10-08T23:51:40+5:302019-10-08T23:53:35+5:30

गावातील रेणुका देवीच्या समोर सार्वजनिक सप्ताहाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु असताना दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ७ आॅक्टोबर रोजी रेणाखळी येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

Parbhani: Launching at Renakhali | परभणी: रेणाखळी येथे हाणामारी

परभणी: रेणाखळी येथे हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : गावातील रेणुका देवीच्या समोर सार्वजनिक सप्ताहाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु असताना दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ७ आॅक्टोबर रोजी रेणाखळी येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
रेणाखळी येथील अशोक बालासाहेब देपाळे हे गावात रेणुकादेवीच्या मंदिरासमोर सुरु असलेल्या सप्ताहातील महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तुम्ही सभामंडपात जेवणासाठी बसू नका, या कारणावरुन मुकेश उद्धव श्रावणे, शाम उद्धव श्रावणे, पांडुरंग सुदाम श्रावणे, राम सोपान श्रावणे, सुभाष सोपान श्रावणे, अक्षय सुदाम श्रावणे, संपत प्रभू हरकळ, विष्णू संपत हरकळ, पांडुरंग संपत हरकळ या ९ जणांवर तर उद्धव अंबादास श्रावणे हे सार्वजनिक सप्ताहाच्या पंगतीवर माईकवर बोलत असताना साथीदार जमा करुन मारहाण केल्याची फिर्याद दिल्यावरुन उत्तम साहेबराव देपाळे, बाळू उत्तम देपाळे, उत्तम साहेबराव देपाळे, अशोक बालासाहेब देपाळे, सटवाजी साहेबराव देपाळे, कृष्णा बालासाहेब चिंचणे, आनंद लक्ष्मण शिंदे या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांच्या परस्पर फिर्यादीवरुन १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Parbhani: Launching at Renakhali