परभणी : वाहकाने १० रुपयांचा अपहार केल्याचे तपासणीत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:27 IST2019-08-17T23:26:18+5:302019-08-17T23:27:08+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एस.टी.बसची तपासणी सुरु करताच वाहकाला चक्कर येऊन त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर घडला. यावेळी तपासणीत १० रुपयांचा अपहार झाल्याचे पथकाला आढळून आले.

परभणी : वाहकाने १० रुपयांचा अपहार केल्याचे तपासणीत उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एस.टी.बसची तपासणी सुरु करताच वाहकाला चक्कर येऊन त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर घडला. यावेळी तपासणीत १० रुपयांचा अपहार झाल्याचे पथकाला आढळून आले.
गंगाखेड आगारातील धनेगाव- गंगाखेड ही एम.एच.०७-सी-७२४७ क्रमांकाची बस शनिवारी सकाळी धनेवाडी येथून गंगाखेडकडे येत होती. ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर एस.टी.महामंडळाचे मार्ग तपासणी पथक उभे होते. यावेळी या पथकातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक शरद पाटील, आर.जी.शिंदे, वाहतूक नियंत्रक धनजकर, कदम यांनी बसमधून उतरणाऱ्या व बसमधील प्रवाशांजवळील तिकीटांची तपासणी सुरु केली. त्यावेळी मरडसगाव पाटीपर्यंत प्रवास करणाºया काही प्रवाशांपैकी एका प्रवाशाजवळ तिकीट आढळून आले नाही. याबाबत सदर प्रवाशाला विचारले असता त्याने वाहकाला दोन फुल्ल व एक हाफ तिकीटाचे पैसे दिल्याचे सांगितले. त्यानंतर केलेल्या तपासणीत सदर वाहकाने १० रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहक बालाजी संभाजी सावंत (४५, रा.बडवणी ता,गंगाखेड) यांचा जबाब नोंदविण्यासाठी विचारणा केली असता पैसे घेतल्याचे सांगत नजर चुकीने हा प्रकार घडल्याचे वाहकाने सांगितले. त्यानंतर सदरील वाहकास अचानक चक्कर आली व तो जागीच बसल्याने पथकातील कर्मचाºयांनी एस.टी.बस थेट गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणली. तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा गौस, अधिपरिचारिका निता देशमुख, प्रशांत राठोड यांनी सदरील कर्मचाºयावर प्रथमोपचार केले; परंतु, वाहक बालाजी सावंत यांच्या हृदयाचे ठोके मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना समजताच स्थानक प्रमुख रामेश्वर हडबे, सहाय्यक वाहतूक निरिक्षक माऊली मुंडे व वाहकाने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर
मार्ग तपासणी दरम्यान धनेवाडी ते गंगाखेड चालणाºया बसमधील एका प्रवाशाकडे तिकीट आढळून आले नसल्याने व सदरील प्रवाशाने तिकीटाचे पैेसे वाहकाकडे दिल्याचा जबाब दिला. त्यामुळे सदरील वाहकावर १० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तपासणी पथकाने ठेवला असून सदरील कर्मचाºयावर पुढील कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला असल्याची माहिती तपासणी पथकातील शरद पाटील, आर.जी.शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.