परभणी : जिल्हा मध्यवर्ती बँकेची इंटरनेट सेवा तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:57 IST2019-05-16T00:57:14+5:302019-05-16T00:57:42+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील इंटरनेट तीन दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी, ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.

परभणी : जिल्हा मध्यवर्ती बँकेची इंटरनेट सेवा तीन दिवस बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा (परभणी) : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील इंटरनेट तीन दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी, ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.
चारठाणा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत सेलू तालुक्यातील १२ गावांचे दुष्काळी अनुदान जमा झाले आहे. आतापर्यंत अरसड, बोथ या गावांचे अनुदान वाटप झाले असून सध्या बोरकिनी गावाचे अनुदान वाटप करण्याचे काम सुरू आहे. त्यातच बँकेची इंटरनेट सेवा बंद झाल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चारठाणा येथील इंटरनेट बंद असल्याने शेतकऱ्यांना जिंतूर येथे जाऊन कामे करावी लागत आहेत. सकाळी विड्रॉल स्लिप जमा करून ती पास करण्यासाठी जिंतूर येथील शाखेत नेली जात आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरा शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जात आहेत. त्यातही काही जणांना पैसे मिळतात तर काही जणांना मिळत नाहीत. तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद झाली असताना एकही जबाबदार अधिकारी या शाखेकडे फिरकला नाही. तालुका बँक तपासणीसाचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. येथील इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
चौथ्या दिवशी सुरू झाली इंटरनेट सेवा
४चारठाणा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील इंटनेट सेवा अचानक चौथ्या दिवशी सुरू झाली. येथील इंटरनेट बंद पडल्यानंतर तांत्रिक कर्मचारी फिरकला नसताना अचानक सेवा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
४येथील इंटरनेट सेवा अचानक सुरू झाल्याने याबाबत ग्राहकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.