शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

परभणी : कामकाज साक्षरतेने वाढविली क्रयशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:55 PM

कोणतेही प्रशिक्षण न घेता शासकीय नोकरीत रुजू झाल्यानंतर जुन्याच सहकाऱ्यांकडून घेतलेल्या ऐकीव माहितीच्या आधारे काम करीत असताना कर्मचाऱ्यांच्या अनेक चुका होतात़ शिवाय अर्धवट माहितीमुळे फाईल्स प्रलंबित ठेवण्याचे प्रकार घडतात़ ही बाब टाळण्यासाठीे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी कर्मचाºयांना दररोज संबंधित विभागातील प्रत्येक कायदा व कामकाजाची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाने क्रयशक्तीत व आकलन शक्तीत वाढ झाल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोणतेही प्रशिक्षण न घेता शासकीय नोकरीत रुजू झाल्यानंतर जुन्याच सहकाऱ्यांकडून घेतलेल्या ऐकीव माहितीच्या आधारे काम करीत असताना कर्मचाऱ्यांच्या अनेक चुका होतात़ शिवाय अर्धवट माहितीमुळे फाईल्स प्रलंबित ठेवण्याचे प्रकार घडतात़ ही बाब टाळण्यासाठीे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी कर्मचाºयांना दररोज संबंधित विभागातील प्रत्येक कायदा व कामकाजाची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाने क्रयशक्तीत व आकलन शक्तीत वाढ झाल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे़शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर कर्मचाºयांना त्यांच्या कामकाजासंदर्भात प्रशिक्षण मिळालेले नसते़ जुन्या सहकाºयांकडून कामकाजासंदर्भात जी माहिती सांगितली जाते तीच माहिती प्रमाण मानून नवीन कर्मचारी कामाला सुरुवात करतात़ कालांतराने ऐकीव माहितीच्या आधारेच अनेक निर्णय घेतले जातात़ शिवाय एखाद्या बाबीची माहिती नसल्यास सदरील फाईल निर्णयाविना प्रलंबित ठेवण्याची प्रवृत्ती बळावते़ परिणामी नागरिकांच्या कामाला दिरंगाई होते़ त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेविषयी संबंधित नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटतो़ ही बाब टाळण्याच्या अनुषंगाने व आपल्या विभागातील कर्मचाºयांना तो ज्या टेबलवरचे काम करतो, त्या टेबलची परिपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोनातून त्यांना साक्षर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी तीन महिन्यांपूर्वी घेतला़ त्यानंतर ते नियमितपणे कर्मचाºयांना दररोज सकाळी एक तास कामकाजाबाबत माहिती देत आहेत़ त्यामध्ये कुळ कायदे, कमाल जमीन धारणा अधिनियम अंमलबजावणी, अतिरिक्त जमिनीचे वाटप, भूधारणा, भूसंपादन समन्वय आदी बाबींचा समावेश आहे़ संबंधित कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? त्या अनुषंगाने काय कारवाई केली पाहिजे? या संदर्भातील माहिती ते कर्मचाºयांना देत आहेत़ याचा फायदाही कर्मचाºयांना होताना दिसून येत आहे़ १८ नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार, संबंधित विभागाचे अव्वल कारकून, लिपिक यांना प्रशिक्षण दिले़ १९ नोव्हेंबर रोजी महसूल अधिनियमांतर्गत वारसा जमीन वाटपाबाबत माहिती दिली़ त्यांच्या या विभाग साक्षर उपक्रमामुळे कर्मचारी खूश असून, नवनवीन माहिती मिळत असल्यामुळे नियमित कामकाज करणे सुकर झाल्याचे कर्मचारी सांगतात़ डॉ़ कुंडेटकर यांनी राबविलेला उपक्रम प्रत्येक विभाग प्रमुखांनी संबंधित कर्मचाºयांसाठी राबविल्यास फाईल्स प्रलंबित राहणार नाहीत व जनतेचे विषय मार्गी लागतील, असेही कर्मचाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नवनवीन कायदे व शब्दांची झाली ओळख४मुंबई कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८, १९५८, हैदराबाद कुळ वहीवाट व शेत जमीन अधिनियम १९५०, कमाल जमीन धारणा अधिनियम आदी बाबतची परिपूर्ण माहिती नव्हती़ या संदर्भात उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी कर्मचाºयांसाठी वर्ग घेऊन अत्यंत उपयुक्त माहिती दिली़ महसूलमधील जे शब्द कधी ऐकले नव्हते़ त्याबाबतची सखोल माहिती मिळाल्याने ज्ञानात भर पडली आहे़ त्यामुळे अशा वर्गाची कर्मचाºयांसाठी किती आवश्यकता आहे, याची प्रचिती आली़-वर्षा महामुनी, अव्वल कारकूनजमिनीचा ताबा, मालकी हक्क सोड पत्र, महसूल अधिनियम आणि नियम यातील तरतुदी आदी बाबींची पहिल्यांदाच या प्रशिक्षणामुळे माहिती मिळाली़ अनेक बेसिक बाबींची माहिती मिळाल्याने आता फाईलवर नोट लिहित असताना किंवा निर्णय घेत असताना फारशा अडचणी येत नाहीत़ अडचण आलीच तर उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर हे तातडीने मार्गदर्शन करतात़ त्यामुळे नियमित कामकाज अधिक गतीने करता येत आहे़-राधा चांदणे, लिपिकफौजदारी प्रक्रिया संहिता, मुंबई पोलीस कायदा, दागिन्यांची ओळख परेड आदी कधीही न ऐकलेले शब्द आता समजू लागले आहेत़ या बाबींच्या खोलात गेल्यानंतर महत्त्वपूर्ण माहिती मिळत असल्याने कामातील रुची वाढली आहे़ शिवाय पायाभूत माहितीसह बदललेले कायदे आणि कालबाह्य झालेले कायदे याबाबतचीही माहिती दररोजच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळत आहे़ ज्यामुळे कामकाजात बदल झाल्याचा अनुभव येत आहे़ त्यामुळे कामाबाबत उत्सुकता वाढली आहे़-पल्लवी उबाळे, लिपिक,तीन महिन्यांपासून महसूल विभागाशी संबंधित अत्यंत नाविन्यपूर्ण माहिती मिळाली़ यापूर्वी इतरांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे काम करीत असताना अडचणी येत होत्या़ त्यामुळे फाईल्सवर निर्णय घेतानाही अडचणी यायच्या़ शिवाय वरिष्ठांकडे याबाबत विचारतानाही आपल्याकडेच अपुरी माहिती असल्याने संकोच वाटायचा; परंतु, या विभागात सुरू केलेल्या प्रशिक्षणामुळे नियमित कामकाजात सुलभता आली आहे़ शिवाय कायदे व त्यातील तरतुदी याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे़-प्रीती जोंधळे, अव्वल कारकून

टॅग्स :parabhaniपरभणीEmployeeकर्मचारीGovernmentसरकार