परभणी : सज्जावर तलाठी नसल्यास वेतनवाढ रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:21 IST2019-07-20T23:20:32+5:302019-07-20T23:21:20+5:30
जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी २४ जुलैपर्यंत तलाठी सज्जावर दररोज उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिला आहे़

परभणी : सज्जावर तलाठी नसल्यास वेतनवाढ रोखणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी २४ जुलैपर्यंत तलाठी सज्जावर दररोज उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिला आहे़
‘हस्तलिखित सातबारांसाठी शेतकऱ्यांची धावपळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १५ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय मांडली होती़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी स्वतंत्र आदेश काढले असून, तलाठ्यांना सज्जावर उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे़ सध्या पीक विमा योजनेसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले जात आहेत़ २४ जुलै ही अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख असून, या अर्जासाठी गाव नमुना सातबारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे़ मात्र सातबारा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी काही गावांमधील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात केल्या आहेत़
त्यामुळे शेतकºयांना वेळेत सातबारा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तलाठ्यांनी २४ जुलैपर्यंत त्यांच्या तलाठी सज्जावर उपस्थित रहावे़ खातेदारांना त्यांची कागदपत्रे वितरित करावीत़ त्याचप्रमाणे गावात बायोमॅट्रिक हजेरी नोंदवावी़ जे तलाठी, मंडळ अधिकारी या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाºयांनी या आदेशात दिला आहे़
नियमांमुळे अडचण
जिल्हा प्रशासनाने पीक विम्यासाठी हस्तलिखित सातबारा जोडणे बंधनकारक केले आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे़ विशेष म्हणजे डिजीटल सातबारा उपलब्ध असतानाही त्या ग्राह्य धरल्या जात नाहीत़ प्रशासनाने डिजीटल सातबाराही पीक विम्यासाठी ग्राह्य धराव्यात, अशी शेतकºयांची मागणी आहे़
शेतकºयांची वाढली संख्या
यावर्षी जिल्ह्यात पावसाने दगा दिला आहे़ अनेक शेतकºयांनी पेरणी केली आहे़ ही पिके काही प्रमाणात उगवली असली तरी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांना धोका निर्माण होणार, अशी दाट शक्यता शेतकºयांना वाटत आहे़ परिणामी या पिकांना विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने मोठ्या संख्येने शेतकरी विमा काढत आहेत़ तेव्हा या शेतकºयांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे़