शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

परभणी : ईव्हीएम विरोधात घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:42 IST

निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना, एमआयएम यांच्या वतीने १७ जून रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना, एमआयएम यांच्या वतीने १७ जून रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले़सर्वसामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास राहिला नाही. अनेक विकसित देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली असून मतपत्रिकेद्वारेच मतदान घेतले जात आहे. त्यामुळे ईव्हीएमला भारतातून हद्दपार करण्यासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात १७ जून रोजी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच प्रत्येक तहसील कार्यालयासमोर घंटानाद करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार भारिपच्या वतीन सोमवारी दुपारी १२ वाजता हे आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात घोषणा दिल्या. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण कनकुटे, आलमगीर खान आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़गंगाखेडात प्रतिकात्मक मतदान यंत्र जाळलेच्गंगाखेड- ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रतिकात्मक ईव्हीएम मतदान यंत्र कार्यकर्त्यांनी जाळले़च्गंगाखेड येथे सकाळी ११ च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर जमले़ त्यांनी ईव्हीएम मतदान यंत्राच्या विरोधात घोषणाबाजी केली़ त्यानंतर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळण्यात आली़ तसेच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला़च्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष वामनराव राठोड, भारिपचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे, सय्यद रुस्तम, संदीप भालेराव, अनिलसिंह चव्हाण, गोविंदराव वैद्य, भगवान देवरे, रमेश पैठणे, निवृत्ती केदार, बाबासाहेब गायकवाड, अंकुश पैठणे, प्रकाश भालेराव, राजभाऊ पैठणे, सुनील पवार, संदीप फड आदींची उपस्थिती होती़पाथरीत कार्यकर्र्त्यांनी केली घोषणाबाजीच्पाथरी : ईव्हीएम विरोधात पाथरी येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली़च्प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष अ‍ॅड़ अशोक पोटभरे, दिलीप ढवळे, मुजीब आलम, अंगद वाघमारे, राजकुमार गायकवाड, श्याम ढवळे, आवडाजी ढवळे, मुंजाजी साळवे आदींची नावे होती़पालम शहरामध्ये आंदोलनपालम- येथील तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना व एमआयएमच्या वतीने १७ जून रोजी पालम तहसील कार्यालयासमोर शहरातील कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता धरणे धरले. त्यानंतर घंटानाद करून ईव्हीएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार श्रीरंग कदम यांना निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात अरविंद थिटे, कैलास झुंजारे, अमोल कदम, राहुल शिंदे, गौतम हनवते, दयानंद हाके, भीमराव रायबोले, रावसाहेब वावळे, जय हनवते, प्रकाश गालफाडे, सुमेध वाघमारे आदीसह कार्यकर्ते मोठा सहभागी झाले होते.मानवतमध्ये तहसीलदारांना निवेदनमानवत : येथील तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने १७ जून रोजी दुपारी १ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात दीपक ठेंगे, भारती लाटे, वैशाली सोनावणे, आशा कुमावत, श्रीरंग पंडित, कार्तिक मुजमुले, भीमराव तुपसमिंद्रे, राज एडके, नागसेन भदर्गे, तुकाराम लांडगे, नंदू लांडगे, प्रकाश खंदारे, कोंडिबा गायकवाड आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनElectionनिवडणूक